ज्या शब्दाला ब्रह्म तत्त्वाचा स्पर्श आहे; नव्हे, जो शब्दच मुळी ब्रह्म आहे. तो शब्द म्हणजे आई. आई विषयी काय लिहावे? कुण्या कवीनं म्हटलं “सागराची केली शाई अन् धरतीचा केला कागद, तरी लिहून होणार नाही आईचा महिमा”. अगदी खरंय ते!!!
रविवार 10 मे 2020 रोजी जागतिक मातृदिन निमित्त सनशाइन स्टार किड्स प्रीस्कूल, कोणार्क नगर तर्फे “मम्मी आणि मी ऑनलाईन स्पर्धाचे” आयोजन करण्यात आले होते. पालकांकडून आईवर लेख तसेच आई व पाल्याचा सेल्फी मागवण्यात आला होता. या ऑनलाईन स्पर्धेला चांगला प्रतिसाद पालकांकडून विशेषतः मातांकडून मिळाला.
स्पर्धेमध्ये सौ. कांचन अहिरे, सौ. अश्विनी गायकवाड, सौ.गौरी शिंदे, सौ.लीना विसपुते, सोनाली राठोड, सौ. रोशनी पवार, सौ. जान्हवी महाजन, सौ. आरती उदावंत, सौ. सुप्रिया तेजाळे, सौ .लीना विसपुते, सौ. लीना देवरे, सौ. स्मिता झोमन, सौ. रोहिणी लबडे, सौ .वंदना सोलंकी, सौ. पुनम काळे, सौ. वैशाली जाधव, सौ. मनीषा भाडंरिगे, ऋतुजा भाग्यवंत, सौ. सोनाली पाटील आणि अशा भरपूर पालकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेते जाहीर करण्यात आले. लाॅकडाउन नंतर सदर विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.
प्रथम पारितोषिक विजेत्या आहेत सौ.जान्हवी महाजन, द्वितीय पारितोषिक विजेत्या सौ. लीना विसपुते आणि तृतीय पारितोषिक विजेत्या आहेत सौ.पुनम काळे आणि उत्तेजनार्थ बक्षीस सौ.सुप्रिया काळे यांनी पटकाविले आहे. सनशाईन स्टार किड्स तर्फे विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवणारे तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सनशाईन स्टार किड्स च्या संचालिका व मुख्याध्यापिका सौ. स्वाती प्रशांत बडगुजर यांच्याकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Leave a Reply