आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज जयंती – श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, नाशिक

आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज जयंती…

छत्रपती संभाजीराजे भोसले (14 मे,1657–11 मार्च,1689) हेे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारे, प्रजेचे संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे जेष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.

पराक्रमी संभाजी महाराज…

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांनी आपल्याकडे घेतली. 16 जानेवारी इ. स.1681 रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर राज्याभिषेक झाला. अल्पवधीतच त्यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या विस्तार केला.

मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एक हाती लढा दिला. महाराजांनी गनिमी कावा करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी एकूण 120 युद्धे लढली व व ही सर्व युद्धे त्यांनी जिंकली असा उल्लेख आढळतो.

शौर्य गाथा…

संभाजी राजांनी आपल्या अतुल्य शौर्य आणि लष्करी तेजाने आपले सामर्थ्य सिद्ध केले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी रामनगर येथील पहिली लढाई जिंकली. वयाच्या 14 व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांना सोळा भाषा अवगत होत्या. शिवाजी महाराज जरी नौसेनेचे जनक असले तरी संभाजी महाराजांनी पाच जहाज बांधणीचे कारखाने उभारून मोलाचे योगदान दिले.

‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या 70 हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले.

महाराजांची विशेष कामे…

▪ जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला.

▪ युध्द भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार केले.

▪ दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले.

▪ रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.

छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे शत्रूच्या हाती लागले. 11 मार्च 1689 रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.

मन असे ज्याचे,
कवी जैसे अलवार…

परी शत्रुसाठी सदैव,
हाती तळपती तलवार…

झेप असे सिंहाची,
दिसण्यास राजबिंडा…

स्वराज्य राखण्या,
हाती भगवा झेंडा…

शुर, वीर जसे,
सुर्याचे तेज साजे…

असा शोभे आपुला,
सिंहाचा छावा शंभुराजे…

शंभुराजे जयंतीच्या शुभेच्छा…!

स्वराज्याचे संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा…आणि त्रिवार वंदन…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*