सांग सांग भोलानाथ, कोरोना जाईल का ? – कु. मानसी मनोज कोतवाल, कुर्हे पानाचे

सांग सांग भोलानाथ ,
कोरोना जाईल का ?
शाळे भोवती भीती दाटून ,
सुट्टी मिळाली का ?

भोलानाथ दुपारी पोलीस ,
झोपतील काय ?
हळूच बाहेर पडताना ,
चाहूल लागेल काय ?

भोलानाथ भोलानाथ ,
खरं सांग एकदा !
या नंतर लॉक डाऊन
येतील तरी कितीदा ?

भोलानाथ तू सुध्दा ,
नियम सगळे पाळ !
नाही तर तुझी ही ,
कोरोना शी पडेल गाठ !

तुम्ही सुध्दा शासनाने दिलेले नियम पाळा
आणि कोरोना टाळा !
?????

घरीच रहा सुरक्षित रहा ?️

कु. मानसी मनोज कोतवाल, कुर्हे पानाचे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*