बडगुजर समाजातील ध्येयवादी, निर्भीड पत्रकारितेची गौरवशाली परंपरा पुढे घेऊन जात, ‘शब्दांना सत्याची धार’ देत बडगुजर समाजातील वृत्तपत्रसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारं पाक्षिक बडगुजर दर्शन आपला अठरावा वर्धापन दिन साजरा करीत असल्याचे समजून आनंद झाला.
पाक्षिक बडगुजर दर्शन च्या वर्धापनदिनानिमित्त पाक्षिकाचे संस्थापक, सल्लागार संपादक, पाक्षिकाचे संपादक श्री. प्रकाश बबनशेठ बडगुजर, संबंधित सर्व पत्रकार मित्र, व्यवस्थापनाशी संबंधित सर्व मान्यवर, हितचिंतक, तसेच समस्त वाचक बडगुजर बांधवांचे सर्वप्रथम आम्ही मनापासून अभिनंदन करतो.
पाक्षिक दर्शनची भविष्यातील वाटचाल अधिक दिमाखदार होईल, यशस्वी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. दर्शन मधल्या लेखनातून समाजातील सामाजिक चळवळीला, समाजाच्या सर्वसमावेशक विकासाला नवी दिशा मिळावी, अशा शुभेच्छा या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आम्ही देतो.
बडगुजर समाजात पत्रकारितेत आपले स्थान निर्माण करत असतांना, समाजातील प्रत्येक वृत्तपत्राने/डिजिटल व्यासपीठाने आपली वैचारिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा. ही वैचारिक बांधिलकी त्या त्या वृत्तपत्राची ओळख बनते. पाक्षिक दर्शननेही आपली वैचारिक तसेच सामाजिक बांधिलकी सुरुवातीपासून जपली आहे. पाक्षिक दर्शनला स्वतंत्र ओळख देण्यात या बांधिलकीचाही मोठा वाटा आहे.
त्याबद्दल ‘दर्शन’च्या संपादकीय मंडळाचे आणि संपादकीय कामकाजाशी संबंधित सर्वांचे आम्ही अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे मनापासून अभिनंदन करतो.

समस्त वेब पोर्टल टिम – धन्यवाद ?

Leave a Reply