पीएम फंड व चीफ मिनिस्टर फंड ला वाढदिवस साजरा न करता मदत करून प्रमोद बडगुजर व उर्विश बडगुजर ह्या पिता-पुत्रांनी समाजापुढे ठेवला आदर्श – प्रा. प्रशांत बडगुजर सर, नाशिक

श्री. प्रमोद भीमराव बडगुजर यांचा जन्मदिवस 10 एप्रिल रोजी व त्यांचा मुलगा उर्विश प्रमोद बडगुजर याचा वाढदिवस हा 15 एप्रिल रोजी होता. तो साजरा न करता होणारा खर्च पीएम फंड , चीफ मिनिस्टर फंड जमा केला

कोरोना ने सध्या संपूर्ण जगात तसेच भारतात थैमान घातले आहे, या परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. सध्या उद्धभवलेल्या बिकट परिस्थितीला भारत सरकार व महाराष्ट्र शासन मोठ्या हिमतीने तोंड देत आहे.

अशा परिस्थितीत प्रमोद भीमराव बडगुजर व उर्विश प्रमोद बडगुजर ह्या पिता-पुत्रांनी आपला जन्मदिवस साध्या, घरगुती पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय केला आणि कठीण परिस्थितीत असणाऱ्या आपल्या भारत सरकार व महाराष्ट्र शासनाला मदत करण्याचा निर्धार केला.

श्री प्रमोद भीमराव बडगुजर यांनी आपल्या जन्मदिनानिमित्त पीएम केअर फंड ला 2001 / – (दोन हजार एक रुपये) मदत केली, त्याचप्रमाणे श्री प्रमोद यांचा मुलगा चिरंजीव उर्विश प्रमोद बडगुजर यांने आपल्या जन्मदिवसानिमित्त चीफ मिनिस्टर रिलीफ फंड ला 1000 / – (एक हजार रुपये) ला मदत करून खारीचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे त्यांची जन्मभूमी महाराष्ट्रराज्य असून कर्मभूमी गुजरातराज्य आहे परंतु त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या फडातही जमा करून बडगुजर समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

श्री प्रमोद भीमराव बडगुजर हे मूळचे पिंपरखेड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव रहिवासी असून सध्या सुरत येथे एका खाजगी कंपनीत अकाउंटंट चे काम करतात. आर्थिक परिस्थिती साधारण असणाऱ्या कुटुंबाने मनाचा मोठेपणा दाखवून फार मोठे समाजकार्य पार पाडले आहे त्यासाठी सदर कुटुंबाचे बडगुजर प्राऊड व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती तर्फे हार्दिक अभिनंदन.

प्रमोद बडगुजर व उर्विश बडगुजर

2 Comments

  1. Great job…

    मी व माझ्सया परिवारा तर्फे सर्व पोलिस प्रशासन, आरोग्यसेवा, अतिदक्षता , आत्यवशक सेवा तसेच घरी बसुन PM व CM खात्यात आपल्या आपल्या परिने रक्कम दान करणाऱ्या व घरी बसुन सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बाधवाचे , भारतीयाचे अभिनंदन व असेच समाज कार्य आपल्या हातुन घडत राहो..

    आई चामुंडा मातेचा अशिर्वाद सदैव आपल्या पाठिशी राहो..

  2. श्री प्रमोद बडगुजर यांचा दातृत्वाबद्यल अभिनंदन,त्याचा आदर्श मुजरा

Leave a Reply to Yashwant K Chavan Cancel reply

Your email address will not be published.


*