मागील एका महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे . संपूर्ण जगाला या वैश्विक महामारीने वेढले आहे. आपण भारतीयांनी विविध उपाययोजनांचा यशस्वी वापर करून, कोरोना विषाणू विरुद्ध विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचे आपल्याला योग्य पालन करायचे आहे.
१. आमचा सकारात्मक दृष्टिकोन – या वैश्विक महामारीविरुद्ध आम्ही आमचा लढा यशस्वी करू, यावर सर्वांनी दृढ विश्वास ठेवायचा आहे.
२. शासकीय नियमांचे काटेकोर पालन – शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, नागरिक म्हणून आमची जबाबदारी, स्वतःला तसेच कुटुंबाला सांभाळण्याची भावना इ .आम्हास या प्रतिकूल परिस्थितीत पार पडायची आहे.
३. इतरांसाठी असलेली जबाबदारी- आम्ही सुस्थितीत असू परंतु आमच्या संपर्कातील, जवळच्या परिवारातील, तसेच गरजुंसाठी आमची माणुस म्हणून कामगिरी पार पडायची आहे. आज ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना मदतीचा हात देऊन आपणास समाज ऋण फेडायचे आहे. लक्षात असू द्या, समाज ऋण फेडण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ नाही.
४. सर्वांची सुरक्षितता तर आपली सुरक्षितता – मी घरात सुरक्षित आहे म्हणून जबाबदारी संपत नाही. माझ्या बरोबर सर्वच सुरक्षित होणे गरजेचे आहे. आपल्या खांद्यावर प्रत्येकाची जबाबदारी आहे. पूर्ण जगातून या महामारीचा नायनाट होईल तरच आमची त्यातून सुटका आहे. माझी सुरक्षा इतरांवर अवलंबून आहे. म्हणूनच शासकीय प्रशासन या संकटाची तीव्रता व विविध उपाययोजनांचा अवलंब करून दिवसरात्र परिश्रम करत आहे. त्यांच्या सोबत प्रयत्न करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, पोलीस बांधव, सफाई क्षेत्रांतील कर्मचारी वर्ग, सर्व अत्यावश्यक काम करीत आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत.
आम्हाला दिलेल्या आदेशाचे पालन करायचे आहे. घरी राहून आम्हाला सुरक्षित राहायचे आहे. प्रत्येक व्यक्ती सुरक्षित म्हणजेच समाज सुरक्षित, राज्य सुरक्षित, देश सुरक्षित, संपूर्ण जग सुरक्षित. आपल्या साऱ्यांच्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा, शासकीय नियम काटेकोर पाळा. – श्री. भानुदास बडगुजर, चाळीसगांंव. मो. 9423902098


Leave a Reply