कंजूषी —- कवी भालचंद्र लकडू बडगुजर

  • धना बाबतीतच फक्त माणुस नाही नुसता कंजुष
    कधी दिन दुबळा,उच्च निच,असा काढतोय तो दोष
    धनवान सावकारांचा जर असला कोठे वाढदिवस
    दिर्घायू होवो अश्या सर्वच देती शुभेच्छा भरघोस
    पर गरिबांच्या मुलांना ना वळे मन द्यावा आशिर्वाद
    फक्त गोड हास्य नाट्य करी हे मात्र सत्य निर्विवाद
    निर्धनाच्या कार्यात धनवान किंवा नेत्यास मिळे बहुमान
    श्रीमंताच्या दारी असता उत्सव, होईल दिनांचा अवमान
    रईसाचा पोर चाले लंगडा,सर्व लोक हर्षे वाजवी टाळ्या
    फकिराच पोर चाले ऐटीत,हेच लोक मात्र करी कुटाळ्या
    नका गर्व करू ठाव आहे की जगी रेडा ही बोलला वेद
    म्हणून करूया उदो उदो गरिबाचाही मिटतील सर्व भेद
    विसरू नका बुध्दीपटात राजालाही मारते प्याद शिपाई
    एक दिन गरिब पोर होई साहेब करेल तो निश्चित भरपाई
    खरे तर ही नाही कंजुषी,आहे आर्थिक समतेचा भेदभाव
    परंतू दिन जर झाला जागे,मग ना कोणी देणार यांना भाव
    धनाचा अभिमान,बडेजाव करून होतो धनवान अभिलाषी
    पण कौतुक दिन गरिबांचे करण्या, कधी करू नका कंजुषी

कविताकार
भालचंद्र लकडू बडगुजर,

पंचवटी, नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*