स्वतः विषयी जाणवणारा दृढ विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास मूलतः स्वभावात असतोच, तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो. खर तर आत्मविश्वास ही स्वतःच्या विचारांची प्रतिक्रिया असते. एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो. म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत काही वेळा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचीरांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजत बुध्दीमत्ता, गुणवत्ता आणि क्षमता असून केवळ आत्मविश्वास गमवल्याने काही व्यक्ती अपयशाच्या बळी ठरत असतात. विचारांमध्ये आत्मविश्वासाचा स्त्रोत दडलेला असतो. आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. आत्मविश्वासामध्ये. स्वप्न साकार करण्याची स्वंयप्रेरणा असते. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रयत्नांमधूनच आत्मविश्वास जाणवत असतो. बराच खूप मेहनत आणि नियोजन करूनही यश मिळाले नाही तर… या नकारात्मक विचारांमुळे मनात भीती आणि गोंधळ सतत वाढत असतो. त्यामुळे आत्मविश्वास
मिळविण्यासाठी मुलतः योग्य पद्धतीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा.
विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वतःकडे
वास्तवाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं “कसं ” आणि ” का ” ठरलं की आत्मविश्वास अधिकाधिक वृध्दिगत होत जातो.
आत्मविश्वास म्हणजे जगण्याचं मनोबल…
आत्मविश्वास म्हणजे जगण्यातला आनंद…
आत्मविश्वास म्हणजे जगण्याची उर्जा…. आत्मविश्वास म्हणजे जगण्याची उमेद…..
आणि आत्मविश्वास म्हणजे जगण्यातलं यश…
लेखन : श्री. रविंद्र दयाराम बडगुजर, अध्यक्ष, बडगुजर समाज मंडळ, शिरपूर


Leave a Reply