श्री. अनिकेत पवारकडून कोरोनासाठी सात लाखाचा चेक मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना सुपूर्द – श्री. सुशील मर्दाने,अहमदाबाद

श्री. अनिकेत सुभाष पवार(बडगुजर)मूळ गाव देवकन पिंप्री(खुर्द) असून ते हल्ली मुक्काम मेहसाना येथे राहतात. ते गव्हरमेन्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांंनी आज सात लाखाची भरीव देणगी देऊन बडगुजर समाज गुजरात राज्यातही देणगी देण्यात मागे नाही हे दाखविले

गुजरात मुख्यमत्री सहाय्यता कोव्हिड-19’ निधींला सात लाख रुपयाची मदत देण्यात आली. देणगीचा चेक आज गुजरात राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना आज सुपूर्द केला.
सरकार व यंत्रणा कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देणगी आम्ही देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा मोठा आहे व यात सर्वांनी सहकार्य केले तर लवकरच आपण यशस्वी होऊ. देणगी दिल्या बद्दल बडगुजर समाज सेवा ट्रस्ट ,अहमदाबाद तसेच श्री. सुशील विनोदशेठ मर्दाने यांचे तर्फे तसेच अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन.

मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना चेक सुपूर्द करतांना श्री. अनिकेत बडगुजर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*