सध्याच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींवर मात कशी करावी आणि व्यवसाय कसा वाढवावा? —- संदिप बडगुजर, नंदुरबार


प्रिय मित्रांनो, व्यावसायिकांनो आणि उद्योजकांनो,

मला कल्पना आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आपल्या सर्वांनाच सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रचंड उंचावरून जाणारे विमान अनेकदा हवेच्या जोरदार वादळामुळे हेलकावे खाते. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडलेले असतील. तर यातून आपण काय शिकू शकतो आणि कोरोनाच्या संकटाशी सामना करताना वापरू शकतो?

खाली काही छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्हाला कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत करतील.

१. आपला मासिक खर्च मोजा.
२. त्याला ६ ने गुणा.
३. तुम्हाला पुढील सहा महिने जगवू शकेल एवढे पैसे (कॅश) तुमच्याकडे आहेत का?
४. असतील तर, टीप ८ वर जा. नसतील तर, टीप ५ वर जा.
५. पैसे उभे करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा.
६. शक्य तेवढे खर्च कमी करा.
७. गुंतवणूक, सरकारी अनुदान, सरकारी मदत अशा कोणकोणत्या मार्गांनी पैसे येऊ शकतात याचा विचार करा.
८. अनावश्यक आणि कमी महत्त्वाचे खर्च पुढे ढकला.
९. कोणाकडून तुमचे येणे बाकी असल्यास ते लवकर मिळतेय का ते पाहा.
१०. कर्मचारी, पुरवठादार आणि ग्राहक यांच्याशी सोयीस्कर व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. जसे की वेतन लांबणीवर टाकणे, क्रेडिटवर माल उचलणे, इ.
११. आशावादी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा.
१२. नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
१३. मोफत मार्केटिंगचे मार्ग शोधून काढा.
१४. रेफरल्स आणि रिव्ह्यूज मागा.
१५. ऑफर्स द्या.
१६. इंटर्न किंवा घरी बसून काम करू शकणारे कर्मचारी घ्या.
१७. विक्री वाढवण्यासाठी जॉइंट व्हेंचरच्या संधी शोधा.
१८. आपला व्यवसाय आणि स्वतःची आर्थिक गणिते व्यवस्थित करण्यासाठी, सुधारण्यासाठी या वेळेचा वापर करा.
१९. कमी प्रयत्नात, घरबसल्या कोणत्या वस्तू/सेवा दिल्या जाऊ शकतात याचा विचार करा.
२०. मार्केटिंग आणि ब्रॅंडिंग अजिबात थांबवू नका.
२१. थांबू नका. खचू नका. पुढे जात राहा.

मला माहित आहे, कठीण परिस्थितीचा सामना करणं तसं अवघड आणि त्रासदायक असतं, पण तुम्ही आशावादी दृष्टीकोन ठेवा. हे कोरोना नावाचे वादळ लवकरच संपेल आणि चांगले
दिवस परत येतील???✅???

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*