देशात आणि राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले असून या संकटावर मात करण्यासाठी, अडचणीत सापडलेल्या गोरगरीब, बेघर आणि गरजूंना एक वेळचे जेवण मिळावे. यासाठी दोडांईचा येथील समाजबांधव श्री.आंनदा जगन्नाथ बडगुजर व श्री. सुनिल देविदास बडगुजर यांच्या वतीने दोंडाईचा परिसरात 200 खिचडीची पाकिटे वाटप करण्यात आली.

या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा या परिस्थितीत काही सामाजिक कार्यकर्ते, तरुण युवक आपल्या परीने गरजू लोकांना मदत करत आहेत. तसाच पुढाकार हा दोडांईचा येथील या बडगुजर फरिवाराने घेतला.
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
या उक्तीप्रमाणे या बडगुजर परिवाराने एक मदतीचा हात म्हणून दोंडाईचा परिसरात २०० खिचडीची पाकिटे वाटप केले. याकरिता भुषण बडगुजर, प्रणय बडगुजर, दर्शन बडगुजर, कल्पना बडगुजर, वैशाली बडगुजर यांनी सहकार्य लाभले.

या बडगुजर परिवाराने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. समाजातील सर्व सामाजिक संस्थांनी आपल्या प्रभागातील आपल्या गरजू समाज बांधवांची, आपल्या लोकांची, देशवासियांची आपापल्या प्रमाणे मदत करावी. या बडगुजर परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन .
अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे जाहीर आभार मानतो. आणि असेच सत्कार्य आपल्या हातुन घडत राहो ही सदिच्छा.


बडगुजर समाज सर्व बाबतीत पुढे असतो हे दोन्ही गोष्टींवरुन सिध्द होते.
खिचडीचे पाकिटे तयार करुन ति गोरगरीबांना वाटणे ही अफलातुन कल्पना दोंडाइचातील बडगुजर परीवाराच्या डोक्यातून येणे त्याचे द्योतक होय. तसेंच सद्य परिस्थितीशी निगडीत कविताही जबरदस्त असून कवीकल्पनेची झलक जाणवते