“संचारबंदी काळात गरजू समाज बांधवांना आर्थिक पाठबळ द्या” ——- राजेंद्र बडगुजर सर , कुसुम्बा

?बडगुजर समाज बांधवांना नम्रविनंती?

*"संचारबंदी काळात गरजू समाज*
 *बांधवांना आर्थिक पाठबळ द्या"*

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, “समाजात गरीब व गरजू समाज बांधव आहेत… ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे.अशा लोकांना बडगुजर समाजातील दानशूर व ज्यांची परिस्थिती चांगली आहे,अशा लोकांनी शहरातील,गावातील गरजू गरीब लोकांना मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

*लॉक डाऊनमुळे लोकं घरातून बाहेर पडू शकत नाही.अशा लोकांना जीवनावश्यक वस्तू म्हणजेच (किराणा माल) देवून अशा परिस्थितीत त्यांना मदत करावी. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी ती मदत देणे सुरुही केले आहे.महासमितीच्या अंतर्गत असलेली समाज कल्याण समितीचे प्रमुख श्री.मोहन हिरालाल बडगुजर यांनी डोंबीवली येथील गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे.*

 *फागणे येथे देखील महासमितीचे संचालक व सलोखा समितीचे सचिव श्री.मनोहर बंशीलाल बडगुजर व शशिकांत मनोहर बडगुजर यांनी कै.संजय बंशीलाल बडगुजर यांचे स्मरणार्थ गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे.*

 *इतर शहरांमध्ये व गावांमध्ये देखील बडगुजर समाजातील गरीब व गरजू समाज बांधव आहेत.लॉक डाऊन पिरेडमध्ये त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.तेव्हा अशा समाज बांधवांना समाजातील दानशूर व सेवाभावी व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा.असे आवाहन अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने करण्यात येत आहे.*

( समाजातील दानशुर मंडळींनी निश्चित पुढाकार घेऊन मदत करावी ही आपणास पुनश्च नम्र विनंती करत आहोत.)

                      आपले नम्र

श्री.माधवराव जानकीराम बडगुजर.
(अध्यक्ष – अ.भा.ब.समाज महासमिती)

श्री.भगवान लक्ष्मण बडगुजर.
(उपाध्यक्ष – अ.भा.ब.समाज महासमिती )

श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर.
( सचिव – अ.भा.ब.समाज महासमिती )

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*