निधड्या छातीचा कर्तबदार अधिकारी श्री. रविंद्र बडगुजर, DYSP मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार

मुंबई येथील कर्तबदार, धडाकेबाज, पोलीस उप अधीक्षक श्री. रविंद्र बळीराम बडगुजर पोलीस दलातून ३१ वर्षांच्या सेवेतून ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झालेत.

त्याचे मूळगाव फुफनगरी आणि हरीओम कॉलनी, धुळे असून मुबई पोलीस दलात ते १९८९ पासून कार्यरत होते त्यांना महाराष्ट्र शासनाने ६ फेब्रुवारी २०२० रोजी पोलिस उपअधीक्षक पदी बढती देऊन नागरी हक्क संरक्षण मुबई येथे त्यांना नेमणूक देण्यात आली होती.

श्री. रविंद्र बडगुजर हे श्री. बळीराम राजाराम बडगुजर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांनी आपले बी. एस. सी. चे शिक्षण एस. एस. व्ही. पी. कॉलेजमधून पुर्ण केले. ते गेल्या ३१ वर्षापासून मुबई पोलिस दलात कार्यरत होते. अवितरीतपणे आणि सेवाभावाने आपले कर्तव्य बजाविले आहे.त्याबद्दल त्यांना शासनातर्फे अनेकदा गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत २५० पेक्षा जास्त पारितोषिकासह ४ लाख रु रोख रक्कम बक्षिस म्हणून आपल्या कामगिरी बद्दल मिळाले आहेत. तसेच त्यांनी मुंबईच्या गुन्हे शाखेचे १२ वर्षे काम पाहिले, त्या दरम्यान महत्वाची केस म्हणजे भारत देशाला हादरविणाऱ्या मुंबई येथे झालेला २६/११ च्या हल्लात काम हॉस्पिटलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने २५ हजार रु. रोख रक्कमेसह प्रशस्ती पत्रक देऊन गौरविले आहे. त्याचप्रमाणे मुलुंड रेल्वे स्थानक येथे झालेल्या बॉम्ब स्फोट गुन्ह्याचेही तपास अधिकारी म्हणून काम पाहिले होते.

ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.S.C.) च्या माध्यमातून पोलिस उपनिरिक्षक (PSI) म्हणून मुंबई येथे १९८९ साली नियुक्त झाले. ते बडगुजर समाजातील M.P.S.C. च्या परिक्षामार्फत PSI होणारे पहिले अधिकारी आहेत.

त्यांच्या कार्यकाळामध्ये ते अँटॉप हिल, धारावी, नेहरूनगर, पंत नगर, नालासोपारा यासह विविध ठिकाणी असलेल्या पोलिस स्टेशनला कार्यरत होते. तसेच ते वर्सोवा पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरीक्षक, कलिना येथे ट्रेनिंग सेंटर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून अशा विविध कामगिरी अगदी चोखपणे बजाविल्या आहेत.

  ६ फेब्रवारी २०२० रोजी महाराष्ट्र शासनाने पोलिस उपअधीक्षक पदी बढती देऊन नागरी हक्क संरक्षण मुबई येथे त्यांना  नेमणूक देण्यात आली. ३१ मार्च २०२० रोजी ते सेवा निवृत्त झालेत.

  त्यांनी अतिशय दक्षतेने, आपले कर्तव्य चोखपणे बजाविले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. मुंबई विभागात रविंद्र बडगुजर हे नांव सर्वश्रुत आहे. आपल्या ३१ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक कठोर परिस्थितींना तोंड देत यशस्वीपणे आपली घौडदौड कुठलीही तमा न बाळगता अतिशय प्रभावीपणे पुर्ण केली. ही आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब आहे. 

श्री. रविंद्र बडगुजर सरांना महाराष्ट्र पोलीस दलातुन सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. समाजातील युवकांना आपल्या याप्रवासातून नक्कीच प्रेरणा मिळेल. पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणि आपले पुढील आयुष्य निरोगी आणि आनंददायी असो. ही प्रार्थना.

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
बडगुजर वेब पोर्टल टिम

भविष्यातील भरीव कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा…!

2 Comments

  1. माननीय श्री रविंद्र बडगुजर साहेबांना शुभेच्छा !
    /
    डा.दि.धों.बडगुजर
    सौ.स्वाती दिलीप बडगुजर
    अमरावती

  2. We C B Badgujar & family, Kalwa Wish you very happy healthy & wealthy retired life. Wish you all the best & God bless you & your family.

Leave a Reply to Dr d d b Cancel reply

Your email address will not be published.


*