हाऊ आजार शेना करोना – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव

कोरोना व्हायरस विषयी प्रा. मिलिंद बडगुजर यांनी लिहीलेले अहिराणी गीत. ते स्वतः आपल्या समोर सादर करत आहेत. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा… धन्यवाद.

देख तुरे भाऊ तू बाहेर नको निघू
तो लि तुना जीव एक दिन
हाऊ आजार शेना करोना
येनावर उपाय दुसरा नहीना ।।ध्रु ।।

हाऊ आजार शेना मोठा भारी
तुम्ही काळजीत ल्यांना थोडी
घर मा बठिसनी रायना
असा फिरू नको ना गावमा ।।१ ।।

लक्षणं येना शेत खास
सर्दी खोकला आणि ताप
श्वास लेवाले आडी रायना
फुफुसणी वाट लाई रायना ।।२ ।।

हाऊ चीनना शेना पावना
सारा जगमा फिरी रायना
बंद दार मा तू रायना
नको फिरू तू असा गाव मा।।३।।

हातले हात तू नको देऊ ना
ये ना संसर्ग बरा नही ना
येनावर उपाय एकचना
तू दूरथाईन राम राम करना।।४।।

हाऊ थुकना वाटे पसरी रायना
नाक तोंड डोया कान झाकी ठेवणा कशी मरनी वाट दाई रायना
तू तोंडावर रुमाल बांधी ठेवणा।।५।।

तोंड वर हात असा नको फिरावू ना
हात साबणमा धुईलेना
सारा जगमा तांडव करी रायना
एक मागे एक मारी रायना।।६।।

एकांत वास हाऊ बरा शे ना
गाव शहरे बंद करी रायना
नोकरी रोजगार चोरी रायना
सर्वासले लोकडाऊन करी रायना।।७।।

सरकार नियम करी रायना
तेले साथ तुमी भी द्याना
हातजोडी तुमले मी सांगसना
येनावर उपाय दुसरा नही ना।।८।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*