पाचोरा शहरातील श्री गणेश बडगुजर (एसटी चालक क्रमांक 22054) हे अचानक पाचोरा पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशन मध्ये सर्व कर्मचारी आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. तिथे उपस्थित पोलीस निरीक्षकांनी एसटी चालकास बोलविले व विचारणा केली. त्यावेळी एसटी चालक गणेश बडगुजर यांनी पोलीस निरीक्षकांना सांगितले की "गेल्या कित्येक दिवसांपासून आपण व आपले कर्मचारी नागरिकांची सेवा करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे कोरोणा सारख्या गंभीर आजाराची साथ संपूर्ण जगात सुरू असताना आपण आपल्या जीवावर उदार होऊन व आपल्या परिवाराची तमा न बाळगता अहोरात्र सेवा करीत आहात, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो. एसटी महामंडळात चालक पदावर कार्य करीत असताना आम्हीदेखील प्रवाशांना दैवत मानत असतो. या अनुषंगाने आम्हाला देखील नागरिकांच्या सेवेची संधी मिळावी तसेच आपला थकावा कमी करण्याच्या हेतूने आमच्याकडून मदत घडावी. या उद्देशाने मी या पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे. आपणास चालकाची जिथेही गरज लागेल तिथे कोणताही मोबदला न घेता सेवेत उपस्थित राहील, असे सांगितले.
श्री. गणेश बडगुजर यांचे हे वाक्य ऐकून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गणेश बडगुजर यांना कडक सेलूट ठोकून त्यांच्या हिमतीचे कौतुक केले. अशा कठीण परिस्थितीत आमच्यावर खूप मोठा भार आलेला असताना आपण बिनधास्तपणे या पोलीस स्टेशनमध्ये येऊन कामगिरी करण्याची तयारी ठेवल्याबद्दल आम्हाला तुमच्या सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री गणेश बडगुजर यांचे जळगाव विभागातील सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. तसेच श्री. गणेश बडगुजर यांचे अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन. आपणासारख्या समाज बांधवाचा अभिमान वाटतो.
गणेश बडगुजर 9623582818
??????????
??????????


Leave a Reply