कोरोनाशी लढा…! एकत्रितपणे लढणे हेच शहाणपण – डॉ. सचिन करोडपती, पारोळा

आज देशात ‘कोरोनाने थैमान मांडले आहे. संपूर्ण जगात हा व्हायरस वेगाने प्रसार करीत आहे. पण आता हे संकट आपल्या घरात शिरुन थैमान घालण्याअगोदरच जागे व्हा. अगोदरच त्याने शहरांपासून गावांपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि त्याला कारण एकच आपणा सर्वांचा निष्काळजीपणा. कोरोना हा आजार नवीन आहे आणि त्यावरील १०० टक्के उपचार अजून उपलब्ध नाहीत. प्रयत्न सुरू आहेत. परंतु अजून वेळ लागेल. म्हणूनच आपणा सर्वांना कळकळीचे
आवाहन करतो की, या अनिश्चिततेच्या काळात गोंधळून जाऊ नका. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. शासन अतिशय योग्यप्रकारे काम करीत असून, आपले सर्वांचे सहकार्य खूप आवश्यक आहे. या आजारापासून स्वतःला वाचवायचे असेल तर सर्वांनी घरातच ‘होम क्वारंटाईन’ राहणे
खूप आवश्यक आहे आणि हा कालावधी शिक्षा नसून उपचारच आहे. हे स्वत:सोबतच इतरांना पटविणेदेखील गरजेचे आहे. व्यवसायाची किंवा तब्येतीची विनाकारण चिंता करण्यापेक्षा कुटुंबीयांच्या आणि
समाजाच्या निरोगी अस्तित्वासाठी हा सेल्फ होम क्वारंटाईन’ कालावधी सकारात्मक पद्धतीने कुटुंबीयांसोबत घालविला पाहिजे. आजच्या या संकटात मानसिक आधार देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांपेक्षा समाजातील आदर्श मान्यवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका आज महत्त्वाची असली तरी आपणा सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.

  • डॉ.सचिन बडगुजर, दंतरोग व मुखरोग
    तज्ज्ञ, पारोळा
डॉ. सचिन करोडपती, पारोळा

1 Comment

Leave a Reply to प्रा.सी.डी. साळुंखे ,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*