चीनच्या वुहान प्रांतातून निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने आज पूर्ण जगावर आपलं सावट पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्यापासून आपण लांब नाहीत. हा व्हायरस कसा निर्माण झाला हे गुढीत जरी असले तरी त्याचा प्रसार मात्र आजतायत वेगाने होत आहे.अनेक देश त्याच्या विळख्यात असून त्यापासून आपला भारत देश देखील वाचलेला नाही. अशात आपल्या भारत देशात त्याचा अति प्रसार होऊ नये यासाठी पाहिजे तो पर्याय स्वीकारला जात आहे. आपल्या भारत देशातील पोलिस, डॉक्टर हे आपल्या सर्वांसाठी जरी 24 तास ऑन ड्युटी असले तरी खरी जबाबदारी तर आपणा सर्वांवर अवलंबून आहे. अति धिटपणा मुळे मला काहीच होऊ शकत नाही असा विनाशी आत्मविश्वास माणसांसाठी व पुर्ण मानव जाती साठी आज घातक ठरत आहे. त्यातच रोगाचा अती प्रसार झाल्यास सरकारला दोष देऊन माणूस मोकळा होतो. सरकारने कितपत आपली सर्वांची काळजी घ्यावी खरी काळजी घ्यायची असेल तर ती आपणास आपल्या स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आणि आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजासाठी! आज खरी गरज ठरते आहे ती स्वयंशिस्तची , तुम्ही आम्ही आपण सर्व मिळून जर स्वतः काही बंधन पाडली तर या आजाराला, महामारी ला आळा घालण्यास मदत होईल. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अति गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहावे, स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्यावी, घरात आल्यानंतर हात धुण्याची सवय ही असलीच पाहिजे , सरकारने लादून दिलेला कायदा हा आपल्या हितासाठी आहे त्याला मोडण्याचा प्रयत्न करू नये…. अशी अनेक बंधन शिस्तीचा भाग म्हणून आपण स्वतःवर पडली तर निश्चितच आपणास व आपल्या परिवारास स्वास्थ लाभेल व आज जी महामारी आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. त्या उंबरठ्यावरच त्या महामारी च्या मुसक्या आळवण्यासाठी आपण सज्ज राहू. आरोग्य धनसंपदा! आपण नेहमी म्हणतो हे जितकं खरं आहे तितकंच सरकारने लादून दिलेले नियम देखील तितकेच खरे आहेत. काही दिवसांपर्यंत जर आपण शिस्त पाडली तर काय बिघडणार आहे?
आपला देश स्वस्थ राहण्यासाठी आपला समाज स्वस्त राहिला पाहिजे आपला समाज स्वस्थ राहण्यासाठी आपला परिवार स्वस्थ राहायला पाहिजे.आपण परिवाराचे घटक आहोत आपण स्वस्त राहिलो तर आपला परिवार स्वस्थ राहील. म्हणून काही दिवसांपर्यंत का असेना आपण स्वयंशिस्त पाडुयात आपल्या देशाला रोगमुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊया…… जय हिंद


सरgee!
शत् प्रतिशत् सत्य प्रतिपादनl
सर्वांचे सक्रिय सहकार्य मिळाले सद्यपरिस्थितीत बदल घडविणे शक्य आहे.आपला आरोग्य सल्ला गाठो सुयोग्य पल्ला करुनी कोरोनावर जबरदस्तll
llशुभ सोचो शुभही होगा…शुभम् भवतूःll
सरgee!
शत् प्रतिशत् सत्य प्रतिपादनl
सर्वांचे सक्रिय सहकार्य मिळाले तर सद्यपरिस्थितीत बदल घडविणे शक्य आहे.आपला आरोग्य सल्ला गाठो सुयोग्य पल्ला करुनी कोरोनावर जबरदस्त हल्लाll
llशुभ सोचो शुभही होगा…शुभम् भवतूःll