अमळनेर बडगुजर समाज सखी सहेली मंडळा तर्फे रविवारी बडगुजर समाज मंगल कार्यालयात आयोजित नारी शक्ती सन्मान व हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शर्मिलाताई बडगुजर तर प्रमुख पाहुण्या आमदार श्रीमती स्मिता ताई वाघ,डॉ मयुरीताई जोशी होत्या
यावेळी आमदार स्मिताताई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकते काम स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करू शकते तसेच डॉ मयुरी ताई यांनी कोरोना व्हायरस बद्दल घाबरून न जाता कशी खबरदारी घ्यावी, अशी अतिशय उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाच्य अध्यक्षा सौ शर्मिला ताई म्हणाल्या की स्त्रीयांनी कस जगावं,मुलांवर चांगले संस्कार टाकावेत नारी शक्ती ही मागे नाही असे मार्गदर्शन करताना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेर बडगुजर समाज मंडळाने हळदीकुंकू कार्यक्रम घेतला नव्हता म्हणून समाजाने आपणांस काही देण्यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो या भावनेतून समाजातील काही मंडळी एकत्र येऊन सदर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय आठ्या पाठया पटू कु. सायली किरण बडगुजर, कु. मिनल यशवंत बडगुजर c.s.&c.a final, सौ. रामेश्वरी हितेंद्र बडगुजर MSW 1st At Amalner , सौ. ज्योती समाधान बडगुजर, यशस्वी महिला उद्योजक कुष्णा नोटबुक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रश्मी घनश्याम मांडळकर व सौ. हेमागीताई बडगुजर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथशेठ बडगुजर, मनोहर सुखदेवशेठ बडगुजर, प्रवीण पुडलिक बडगुजर, रमेश चुणीलाल बडगुजर, आर. डी. चव्हाण, दिनेश सुरेश मांडळकर व घनश्याम रमेश मांडळकर यांनी कार्यक्रमास आर्थिक व इतर मदत केली.
दिपप्रज्वलन करताना सौ.शर्मिला ताई संजय बडगुजर सोबत आमदार स्मिता ताई वाघ व डॉक्टर मयुरी ताई जोशी.











Leave a Reply