“८ मार्च जागतिक महिला दिन” विशेष कविता – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

“८ मार्च जागतिक महिला दिन”

महत्वपूर्ण महिला दिन जागतिकl
होऊ देऊ नका तिजला अगतिकll
अर्थपूर्ण मान असे तिजला पहिलाl
जगभरात एकमेव असे महिलाll
आठ मार्च जागतिक महिला दिनl
कौतुकाने करा तक धिना धिनll
होऊ देऊ नका महिलांना अबलाl
सदासर्वदा महिला असू देत सबलाll
लाजू नको तू भाजू नकोl
बाजू मांडाया तू घाबरू नकोl
विझू नको तू थिजू नकोl
आसवात ही भिजू नकोll
अकारण तू गरजू होऊ नकोl
सबला हो तू अबला होऊ नकोll
नव्या युगाची तू गं नवमहिलाl
जगभरात तुजला गं मान पहिलाll
खस्ता खाल्ल्यांत तू गं जन्मभरl। वेळ आली आतां तू हो गं कणखरll

लेखन – प्रा.सी.डी.साळुंखे सर, चोपडा-धुळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*