बडगुजर वेब पोर्टल च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

बडगुजर प्राऊड ग्रुप निर्मित आणि अ. भा. ब. स. युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले डिजीटल व्यासपीठ www.badgujar.in

बडगुजर वेब पोर्टल च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

नमस्कार समाजबांधवांनो,

नुकताच आपण बडगुजर वेब पोर्टल लॉन्च करून एक वर्ष पुर्ण झाले. यानिमित्त आपण बडगुजर प्राऊड ग्रुप आणि अ. भा. ब. स. युवक समितीच्या अनमोल सहकार्याने परत एकदा आपल्यासाठी एक अनोखा उपक्रम घेऊन येत आहोत.

      आम्ही आपल्या समाजातील युवकांच्या / तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी, युवकांना उद्योग व्यवसाय कसा करावा/कुठला करावा त्यासाठी लागणारे साहित्य /भांडवल एक यशस्वी व्यावसायिक / व्यवसाय कसे व्हावे /करावा. तसेच बाजारपेठेतील व्यावसायिक संधी याबाबत तज्ञ उद्योजक मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन आयोजित करत आहोत. व्यवसाय मार्गदर्शन पर कार्यक्रमा संदर्भात आम्ही आपल्या संकल्पना / मार्गदर्शन मागवत आहोत. चला तर मग आपण आम्हाला आपल्या संकल्पना आम्हाला खाली दिलेल्या लिंक वर पाठवा. 

https://forms.gle/zbhYKNLVnp7Vq6Tb6

हा कार्यक्रमातून आपल्या समाजातील युवा पिढीला एक नविन यशाचा मार्ग दाखवू या. सदर उपक्रमास सर्व समाज मंडळांनी सहकार्य करावे. सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. संदीप कोतवाल, नाशिक : 9881717133
श्री. दिनेश बडगुजर, पारोळा : 7709729143
श्री. लोकेश कोतवाल, पुणे : 7030755996

धन्यवाद. ??

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
? जय बडगुजर सेना ?

1 Comment

  1. वेब पोर्टल टीमकडून खूप चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे या माध्यमातून समाजातील होतकरू मुलांना (युवकांना) वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळणार आहे त्यातून तरुण युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत होईल या सर्व टीम चे पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन!
    धन्यवाद! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*