धुळेः येथील सौ.स्नेहलताई जाधव (बडगुजर) नगरसेविका, मनपा धुळे, पै.श्री.मनोजभाऊ जाधव, भोकर-धुळे यांच्या सुविद्य पत्नी व श्री. दिनेश प्रल्हाद बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते, धुळे यांची कन्या. नुकत्याच धुळे महानगरपालिकेच्या विविध समित्यांची निवडणुका झाल्यात त्यात सौ. स्नेहलताईंची महिला बालकल्याण सभापती पदी बिनविरोध निवड झाली. सौ. स्नेहलताई ह्या धुळे शहरातील बडगुजरांचे उभरते नेतृत्व आहे. आपल्या कार्यशैली मुळे त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढली आणि नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि आता महिला बालकल्याण सभापदी पद. यातून त्यांचे राजकीय कौशल्य दिसून येते. सौ. स्नेहल ताईंनी फार कमी वेळात धुळेच्या राजकीय वर्तुळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि आपल्या कार्यकुशलते मुळे पक्षाच्या मान्यवरांनी विश्वास दाखवित त्यांना ही संधी दिली आणि त्याचे सोने करत सभापती पद मिळविले.

मा.खासदार बाबासाहेब सुभाष भामरे,मा.आमदार जयकुमार रावल, मा. भैय्यासाहेब अनुपजी अग्रवाल,भाजप जिल्हाध्यक्ष, धुळे व मा. बापूसाहेब चंद्रकांतजी सोनार,महापौर, धुळे,यांचे मार्गदर्शनानुसार व शिफारशीनुसार सदर निवड झाली.
सौ.स्नेहलताईंचे बडगुजर यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सौ. स्नेहलताई या धुळे महानगरपालिकेतील उच्चपदी विराजमान होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप तथा वेब पोर्टल टीम तर्फे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा?

Leave a Reply