भाटपुऱ्याचे सुपुत्र डॉ..रविंद्र बडगुजर यांनी 10 वी व बारावी विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे युट्युब चॅनल केले विकसीत

तंत्रनिकेतन(डिप्लोमा), इ.११ व १२ वी (सायन्स) अभ्यासक्रम यू-ट्युबवर

भाटपुरा (ता.शिरपुर) – डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया आणि मेक इन इंडिया ही नवीन भारताची बलस्थाने आहेत. जगात आज डिजिटल लर्निंगला मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. ह्या दृष्टीकोनातून इंन्स्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ), लोणेरे- रायगड येथील गणित विषयाचे प्राध्यापक व भाटपु-याचे सुपुत्र डॉ.रविंद्रनाथ काशिनाथ जाधव यांनी मॅथेमॅटिक्स एज्युकेशनल चॅनल यू-ट्युबवर २५ जानेवारी २०१९ रोजी विकसित केले आहे.

ह्या चॅनलची लिंक खालिलप्रमाणे आहे.

https://www.youtube.com/channel/UCgkSceBwrlLKGkCNDc52y-A

सदर चॅनल हे सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. ह्या चॅनलवर गणित विषयाचे १०० पेक्षा जास्त व्हिडीओ उपलब्ध आहेत. ह्या चॅनलचा प्रमुख दृष्टीकोन म्हणजे विद्यार्थी व पालक यांच्यातील गणिताची भिती दूर करणे व त्यांना गणिताची आवड निर्माण करणे हा आहे. महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनमध्ये (डिप्लोमा) प्रथम वर्षात शिक्षण घेणारे, इ. ११ व १२ वी विज्ञान शाखा विद्यार्थ्यांना व दूरशिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना याचा फायदा आहे. सदर मोफत शिक्षणाचा फायदा सर्वांनी घ्यावा. 

       ह्या चॅनलवर गणित विषयाचे धड्यानुसार १०-१५ मिनिटाचे  व्हिडीओ लेक्चर्स प्रत्येक भागावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे शंकासमाधान  व सुसंगत लेक्चर्स  असल्याने विद्यार्थ्यांचा ह्या चॅनलला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे ह्या चॅनलने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. युट्युब ओपन केल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये डॉ.आर.के.जाधव असे टाईप केल्यावर आपणास मॅथेमॅटिक्स एज्युकेशनल चॅनल दिसेल.चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर क्लिक करावे. त्यानंतर आपणास सर्व व्हिडीओचे नोटीफिकेशन येईल.  

ई-लर्निंग प्लॅटफॉर्म – डॉ.आर.के.जाधव यांनी अॅमेझान वेबसाईटवर Applied Mathematics, MathsRK 3-4, MathsRK2 असे ३ मोबाईल अॅप्स मोफत उपलब्ध केले आहेत. सदर  अॅप्स E-Book स्वरूपात विनामुल्य आहेत.

तसेच त्यांनी

www.mathsrk.weebly.com

वेबसाईट विकसित केली आहे.

वरील मोबाईल अॅप्स व वेबसाईटवर इ.७वी ते उच्च शिक्षणासाठी लागणारे २००० गणिताचे सूत्र, महाराष्ट्रातील तंत्रनिकेतनमध्ये (डिप्लोमा) प्रथम वर्षात शिक्षण घेणारे, इ. ११ व १२ वी (विज्ञान) गणित अभ्यासक्रमाच्या नोट्स धड्यानुसार उपलब्ध आहेत. तसेच वेबसाईटवर प्रश्नपत्रिका व इतर उपयोगी माहिती आहे.      

               तसेच त्यांचे तंत्रनिकेतन (डिप्लोमा) विद्यार्थ्यांसाठी

R.K’S Most Likely Question-papers Solution – Dr.R.K.Jadhav

ह्या पुस्तकाच्या ३ आवृती Synergy Knowledgeware, Mumbai येथील प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.यू-ट्युबवरील व्हिडीओ लेक्चर्स, मोबाईल अॅप्स व वेबसाईटमुळे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना याचा फायदा आहे. विद्यार्थी परिवर्तनातून समाज परिवर्तन करून चांगला नागरीक घडविणे हा त्यांचा उद्देश आहे.  

भविष्यातील मिशन –प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व बी.टेक. अभ्यासक्रमास असणारे गणित विषयाचे व्हिडीओ लेक्चर्स यू-ट्युबवर करण्याचे ध्येय आहे.

पत्ता – डॉ.रविंद्रनाथ काशिनाथ जाधव

              इंन्स्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग

             (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ),

             लोणेरे- 402103  जि. रायगड              मो. 8275358794, 9423944310

3 Comments

  1. Very nice work sir. It will be very useful to needy students who cannot afford costly tuition. My heartiest best wishes for your further progress.

Leave a Reply

Your email address will not be published.


*