भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्ती – श्री. संदीप विठ्ठल बडगुजर, अकुलखेडा, चोपडा

अकुलखेडा, ता. चोपडा येथील श्री. विठ्ठल श्रावण बडगुजर यांचे सुपुत्र श्री. संदीप विठ्ठल बडगुजर हे नुकतेच यशस्वीरीत्या आपली सेवा पुर्ण करून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेत.

श्री. संदीप बडगुजर हे ग्रज्युएट आहेत त्यांनी समाजकल्याण महाविद्यालय, चोपडा येथून बी. एस्. डब्ल्यू. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते भारतीय सैन्य दलात ९ जानेवारी २००३ रोजी भरती झाले.

अतिशय कटीबध्दतेने त्यांनी १७ वर्षे अवितरीत पणे देशसेवा केली. आपले कर्तव्य बजावित असतांना युध्दजन्य परिस्थिती असो कि आपात्कालीन परिस्थिती असो अशावेळी एकदम खंबीरपणे उभे राहून त्यांनी आपल्या देशाची सेवा केली.

श्री. संदीप बडगुजर सहपरिवार फोटो

भारतीय सैन्य दलातील आपल्या तुकडीत श्री. संदीप यांनी आपली एक वेगळी छाप सोडली. सर्वांनी संदीप यांना एक वेगळ्या प्रकारे यशस्वी सेवा पुर्ण केल्याबद्दल मानवंदना दिली. दि. ३१ जानेवारी २०२० रोजी ते भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेत. त्यांना एक मुलगा नांव – लोकेश आणि एक मुलगी – संस्कृती आहे. अतिशय सुखी संसारवेल आहे. गेल्या १७ वर्षांत आपल्या परिवाराला योग्य वेळ देता आली नाही पण आता ते पुर्ण वेळ आपल्या परिवाराला देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

श्री. संदीप बडगुजर यांनी भारतीय सैन्य दलात यशस्वी सेवा पुर्ण केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक :
बडगुजर प्राऊड ग्रुप
अ. भा. ब. स. युवक समिती

श्री. संदीप बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*