श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल, बोईसर – एक दानशूर व्यक्तीमत्व – श्री. स्वप्नील बडगुजर, पिळोदे

गांधली पिळोदे ता.अमळनेर चे रहिवासी श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल,ह.मु.बोईसर यांनी शनिवार दि.८/२/२०२० रोजी श्री.राजेंद्र आत्माराम संदानशिव,पिळोदे यांचे सहकार्याने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधली पिळोदे शाळेला रु.२००००/- (वीस हजार रुपये) किंमतीचे विविध खेळांचे साहित्याची भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाचे साधने उपस्थित नसल्याने त्यापासून वंचित असतात. खेळामुळे विद्यार्थ्यांन मध्ये स्फुर्ती आणि नविन ऊर्जा तयार होत असते. विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा म्हणून त्यांनी शाळेस ही भेट दिली.

श्री. विजय मांडेवाल हे एक कुशल इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून तेे बोईसर येथे एका नामांकित कंपनी मध्ये Asst. General Manager म्हणून कार्यरत आहेत. ते वेळोवेळी सामाजिक कार्यासांठी सढळ हाताने मदत करत असतात. त्यांचेवर गांधली व पिळोदे गांवातील समाज व समाजेतर बंधूभगिनींकडून अभिनंदन तथा धन्यवादाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर्स प्राऊड गृप व वेब पोर्टल टीम तर्फे अभिनंदन व धन्यवाद.

श्री. विजय मांडेवाल यांचा सत्कार करतांना शिक्षकवृंद

1 Comment

Leave a Reply to Ravindra kotwal Cancel reply

Your email address will not be published.


*