समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर स्नेह संमेलन उत्साहात संपन्न – श्री. एस्. एम्. बडगुजर सर, डोंबिवली

रविवार दिनांक. ०९/०२/२०२० रोजी जेष्ठ नागरिक संघ रेजेन्सि इस्टेट डोंबिवली (पूर्व) या ठिकाणी मोठ्या उत्साहात भव्य बडगुजर समाज सम्मेलन संपूर्ण दिवसभर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी समाजातील जेष्ठ महिला भगिनी धुळे म.न.पा. माजी.नगरसेविका अ.भा.बडगुजर समाज महासमिती महिला सदस्या सौ.पुष्पाताई वसंतराव बडगुजर ह्या लाभल्या. सोबत अ.भा.बडगुजर समाज कल्याण समितीचे डॅशिंग अध्यक्ष श्री.मोहन हिरालाल बडगुजर, अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समितीचे उप प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर, सौ.पुष्पाताई वसंतराव बडगुजर यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अ.भा.ब.समाज कल्याण समिती उपाध्यक्ष श्री.धर्मेंद्र पोपटराव बडगुजर,उत्कर्ष मंडळाचे उपाध्यक्ष श्री.आर.डी.चव्हाण, सरस्वती मिशनचे प्रतिनिधी श्री.आर.बी.चव्हाण, बडगुजर समाज मंडळ बदलापूर अध्यक्ष श्री.श्रीराम बडगुजर आणि खजिनदार-श्री.धनंजय बडगुजर तसेच बडगुजर समाज मंडळ उल्हासनगर-१ अध्यक्ष श्री.शांताराम भिलमाळ यांना आमंत्रित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सौ.पुष्पाताई यांचे हस्ते चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पुजन,अ.भा.ब.समाज कल्याण समिती अध्यक्ष श्री.मोहन बडगुजर,ओबीसी समिती उप प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमास श्री.शितलप्रसाद द.बडगुजर (सर) यांनी प्रस्ताविक भाषणात सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आणि स्नेह संमेलनाचा हेतु समाज बांधवांनी वर्षातून एकदा एकत्रित येवून सामाजिक सलोखा,एकमेकांची विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण एकत्र येऊन दर वर्षी असाच कार्यक्रम घेण्यात यावा असे आपले मत व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शितलप्रसाद द.बडगुजर (सर) व श्री.सुजित बडगुजर सर यांनी केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.पुष्पाताई बडगुजर यांनी मार्गदर्शन पर भाषण करून आपल्या सुमधुर आवाजात एक गीत सादर केले नंतर सौ.पुष्पाताई बडगुजर-सौ.संगिताताई,श्री.मोहन शेठ- श्री.रामकृष्ण पवार (मंडळाचे अध्यक्ष), श्री.एस्.एम् बडगुजर-श्री.भुषण सु.बडगुजर(मंडळाचे सचिव),श्री.धर्मेंद्र बडगुजर- श्री.सुजित बडगुजर सर (मंडळाचे कोषाध्यक्ष),श्री.आर.डी.चव्हाण- श्री.शितलप्रसाद सर (मंडळाचे उपाध्यक्ष),मंडळाचे अध्यक्ष श्री.रामकृष्ण पवार- श्री.महेश बडगुजर (मंडळाचे मा.सचिव),सरस्वती मिशन प्रतिनिधी श्री.आर.बी.चव्हाण- श्री.भगवान शं बडगुजर (मंडळाचे सदस्य),बडगुजर समाज मंडळ बदलापूर अध्यक्ष श्री.श्रीराम बडगुजर- श्री. शालिग्राम ध.बडगुजर आणि श्री.धनंजय वि. बडगुजर यांचा सत्कार श्री.भुषण सु.बडगुजर (मंडळाचे सचिव) यांचे हस्ते करण्यात आला.


जेष्ठ नागरिक वय वर्षे ७५ पूर्ण झालेल्या सामाज बांधवांचा सपत्नीक सत्कार सौ. सुमनबाई व श्री. रघुनाथ दोधू बडगुजर- श्री.मोहन शेठ, सौ.सरलाबाई वश्री.भिकनराव बडगुजर यांचा सत्कार श्री.एस्.एम् बडगुजर,सौ.शोभाताई व श्री.शांताराम भिलमाळ- श्री.भुषण सु.बडगुजर, श्री.वसंतराव रघुनाथ बडगुजर यांचा सत्कार श्री.सुकलाल खंडू बडगुजर,श्रीमती.सुमनबाई जगदीश बडगुजर- सौ.मिनाक्षी शितलप्रसाद बडगुजर यांचे हस्ते करण्यात आला.

स्नेह संमेलनासाठी खासकरून सांस्कृतिक गायनाचे कार्यक्रमास गायक कलाकार – श्री.पडेलकर सर,सौ.निलमताई,आणि श्री.मोहन शेठ बडगुजर यांनी आपल्या सुमधुर आवाजात रंगीतदार महीफीलीने बहारदार गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री. मोहन शेठ बडगुजर यांनी आपल्या भाषणातून स्थानिक मंडळापासून ते अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती पर्यंत आपले परखड विचार तसेच समाज प्रबोधनपर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डोंबिवली शहरातील बडगुजर समाजातील बांधवांना कन्यारत्न प्राप्त झालेल्या सौ.सोनिया व श्री.विजय मोहन बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दुपारी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनी बाळगोपाळ,आप्तेष्ट नातेवाईकांनी सुग्रास भोजनाचा आनंद घेतला.नंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रेक्षक म्हणून सौ.मिनाक्षी शि.बडगुजर यांनी मुलांचे खेळ व नृत्य सादरीकरण,खेळामध्ये विजयी झालेल्या मुला-मुलींना श्री.शालिग्राम ध.बडगुजर यांचे हस्ते बक्षिसे देण्यात आले. तसेच महीलांचा संगीत खुर्ची, फुगा फोडणे या सारखे खेळ घेण्यात आले.त्यानंतर महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला व शेवटी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे मंडळाचे सचिव श्री.भुषण सुरेश बडगुजर यांनी आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
धन्यवाद! ?

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*