सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्रामीण भागातील बोराडी गावातील जेष्ठ प्रगतशील शेतकरी व समाज बांधव श्री. आप्पासो. बाबुलाल तानकाशेठ बडगुजर यांची नात व कुर्हे पानाचे, ता. भुसावळ येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालायातील आदर्शशिक्षक पुरस्कृत श्री. अरविंद बाबुलाल बडगुजर (ए. बी. बडगुजर सर) यांची मुलगी कु. दिपिका अरविंद बडगुजर हिचे दुबई येथील Optichem Specilities FEZ या कंपनीत नुकतीच निवड झाली. कु. दिपिका हीचे शिक्षण जळगांव विद्यापीठातून M. Tech Paint पुर्ण केले आहे. तिचे लहानपणापासून एक स्वप्न होते की स्वतःच्या मेहनतीने व प्रयत्नाने विदेशात नोकरी मिळविणे. ही नोकरी मिळविताच तिने आपले स्वप्न २०२० या वर्षाच्या सुरूवातीलाच पुर्ण केले. फार कमी लोक असतात, जे स्वप्न बघतात ते पुर्ण पण करतात. त्यापैकी कु. दिपिका ही एक भाग्यवान आहे.तिच्या यशा मध्ये तिच्या आई वडिलांचा सिंहाचा वाटा आहे तसेच भाऊ बहीण आणि नातेवाईकांनी सुध्दा तिला यासाठी मार्गदर्शन केले.
कु. दिपिकाचे वडील हे आदर्श शिक्षक आहेत व त्यांनी आपल्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिले. सर्व विद्यार्थी हा आपलाच परिवार समजून त्यांनी मुलांना यशस्वी होण्यासाठी उत्तम शिक्षण दिले. आणि यामुळेच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कु. दिपिकाच्या यशाने बोराडी परिसरातील नातेवाईक व समाजबांधवांना आनंद झाला आणि तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच कुर्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाच्या उपाध्यक्षा सौ. भावनाताई घनश्याम बडगुजर यांनी कौतुक करतांना म्हटले, कु. दिपिका ही पहिलीच विद्यार्थ्यांनी आहे की जी आपल्या शिक्षणाच्या बळावर विदेशात नोकरी मिळविली. तसेच संस्थेचे युवा नेतृत्व श्री. घनश्याम बडगुजर, संस्थेचे अध्यक्ष आप्पासो. एकनाथ राजाराम शेठ बडगुजर, जि. प. सदस्या सौ. शशिकला एकनाथ शेठ बडगुजर आणि सर्व संचालक मंडळाने दिपिकाचे कौतुक केले. कु. दिपिकाच्या यशामुळे शाळेचे नावलौकिक होत आहे. एक उत्तम शिक्षण रा. धो. मा. विद्यालयातून विद्यार्थ्यांना देण्यात येते. कु. दिपिका हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
कु. दिपिकाचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहावी.
शुभेच्छुक :
अ. भा. ब. स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप,
समस्त वेब पोर्टल टिम


अभिनंदन
Congratulations
Dipika
Keep it more
??????
?????????
Congratulations