अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर श्री. दिनेश भाऊ बडगुजर यांची अध्यक्ष पदी निवड

दिनांक 08/02/2020 आज रोजी अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ पारोळा च्या सर्वसाधारण सभेचे ( जनरल मीटिंग ) आयोजन श्री. बालाजी शाळा पारोळा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत समाजाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, सभेच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री. मोहन बडगुजर सर होते, तसेच श्री. प्रवीण गोटुनाना बडगुजर ( अध्यक्ष ) श्री. रामकृष्ण बाबुलाल बडगुजर (उपाध्यक्ष ) हे उपस्थित होते. सभेस शहरातील तसेच ग्रामीण भागातील समाज बांधव उपस्थित होते. सभेत सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून श्री. दिनेश बडगुजर यांची निवड करण्यात आली.

मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात व ते अ. भा. ब. स. युवक समिती चे जळगांव जिल्हाचे विद्यमान अध्यक्ष सुध्दा आहे. समाजाला डिजीटल युगाशी जोडणाऱ्या बडगुजर. इन वेब पोर्टल वेब पोर्टल टिमचे महत्वपुर्ण सदस्य आहेत. व दिनेश भाऊंना समाजकार्याचा खुप चांगला अनुभव आहे. त्यामुळेच त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच इतर सर्व नवनियुक्त संचालक मंडळास नियुक्तीझाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड गृप तर्फे हार्दिक अभिनंदन…… ??

नवनियुक्त अध्यक्ष श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*