श्री. मोहन हिरालाल शेठ बडगुजर यांचा वाढदिवस सुमधुर गायनाच्या सुरामध्ये दिमाखात साजरा – श्री. धर्मेंद्र बडगुजर, शिरपूर

बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांचा वाढदिवस रेजन्सी गार्डन ग्रुप, रेजन्सी महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ व अ. भा. बडगुजर समाज कल्याण समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस आयोजित केला होता. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष- श्री. शशिकांत कांबळेजी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माननीय उपमहापौर श्री. मोरेश्वरजी भोईर, डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदूजी परब दावडीचे नगरसेवक, श्री. जालिंदरजी पाटील याप्रसंगी अ. भा. बडगुजर समाज कल्याण समितीचे सचिव श्री. घनश्याम अलोणे, ओबीसी समितीचे उपप्रमुख श्री. एस एम बडगुजर,
व मुंबई बडगुजर उत्कर्ष मंडळाचे सचिव श्री. रमाकांत बडगुजर डोंबिवलीचे अध्यक्ष श्री. सुभाष पवार, शितल बडगुजर, राजेंद्र धनजी बडगुजर, सी.पी बडगुजर श्रीराम धोंडू बडगुजर, सुजित बडगुजर याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला तरुण-तरुणी ज्येष्ठ नागरिक व बडगुजर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी श्री. मोहन बडगुजर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी सुमधुर संगीतमय गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याप्रसंगी प्रसिद्ध गायक
डॉ. प्रशांत सुवर्णा , डॉ. मंदार कोराने श्री. मोहन बडगुजर, सी.पी बडगुजर, राजेंद्र धनजी बडगुजर व गायिका विद्या मॅडम, स्वाती मॅडम, नीलम मॅडम आदी कलाकार उपस्थित होते. हा कार्यक्रम सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा झाला.

श्री. दूधमांडे यांनी या कार्यक्रमास खूप सहकार्य केले. एडवोकेट श्री. बापट यांनी पुण्याहून ऑडिओ क्लिप द्वारे शुभेच्छा दिल्या त्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. व या कार्यक्रमाचे सुमधूर व खणखणीत आवाजात विद्या वैद्य यांनी सूत्रसंचालन केले तसेच श्री. मोहन बडगुजर यांनी सर्वांचे आभार मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*