नंदुरबार बडगुजर समाजाचा स्नेहमेळावा रविवारी उत्साहात साजरा

*युवकांना दिशा देण्यासाठी समाज कटीबद्ध
दिलीप बडगुजर : समाजाचा मेळावा
नंदुरबार-समाज छोटा असला तरी एकतेच्या धाग्याने गुंफलेला आहे. आपल्या समाजातील युवकांना योग्य दिशा देवून त्यांना रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करण्यास आपण सर्व कटीबद्ध आहोत, ज्यांच्याकडे युवकांना देण्यासाठी रोजगारापासून ज्ञानापर्यंत जे-जे काही असेल ते द्यावे, असे आवाहन नगरसेवक दिलीप बडगुजर यांनी येथे केले.
नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ व बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील न.पा.शाळा क्र.१ च्या सभागृहात नुकताच बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा झाला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ महिलांच्या हस्ते प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, आयान शुगर प्रा.लिमिटेडचे एम.डी.रविंद्र चिंधा बडगुजर उपस्थित होते. श्री.बडगुजर पुढे म्हणाले, समाजाने एकता दाखविल्याने मला राजकीय पातळीवर पालिकेत सदस्यत्त्व मिळाले आहे. आपल्या समाजाची दखल नेत्यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने समाजासाठी काम करावे. उन्नती मंडळाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी उपक्रम राबविले जातात. त्यास आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक दिलीप बडगुजर यांनी केले. यावेळी श्री.नंदवाळकर म्हणाले, आपला समाज संख्येने लहान असला तरी रचनात्मकदृष्ट्या महान आहे. समाजातील घटकांना हितावह काम करणे आणि त्या कामाचा आपण सदुपयोग करुन घेणे हे आपले कर्तव्य ठरते. आपला समाज संख्येने अल्प असलेल्या गावात समाजातील नगरसेवकांची संख्या चारहून अधिक असल्याचे मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे एकतेच्या माध्यमातून आपण केवळ राजकीय नव्हेतर आर्थिक विकास देखील करु शकतो. महिलांनी केवळ समाजाचा कार्यक्रम, हळदी-कुंकू यात अडकून न पडता सामाजिकदृष्ट्या आपले योगदान द्यावे. पारंपारिक बाबी आणि संस्कृती महिला जपू शकतात. ते करतानाच नव्याची कास धरणे आवश्यक आहे. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुनिता बडगुजर व उपाध्यक्षा सौ.पौर्णिमा बडगुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात महिलांसाठी हळदी-कुंकू व वाण देणे कार्यक्रम झाला. त्यानंतर पती-पत्नी व लहान मुलांसाठी स्पर्धा झाली. त्यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. शेवटी समाजाची वार्षिक मिटींग घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर यांनी केले. तर आभार अश्‍विन भालचंद्र बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या सौ.रेणुका शरद बडगुजर, सौ.प्रिती गिरीष बडगुजर, सौ.वैशाली कैलास बडगुजर, सौ.रेखा सदाशिव बडगुजर, सौ.अनिता भटू बडगुजर, सौ.किरण संजय बडगुजर, सौ.संगिता आबा बडगुजर, सौ.स्वाती मिलिंद पाटील, सौ.आरती संदीप शहा, उन्नती मंडळाचे पंडीत तोताराम बडगुजर, भाईदास दगा बडगुजर, देविदास भगवान बडगुजर, दिनेश शामराव बडगुजर, संदीप लक्ष्मण बडगुजर, विजय जगन्नाथ बडगुजर, भरत सुरेश कोतवाल, गणेश दत्तात्रय बडगुजर, प्रकाश नागो बडगुजर, विलास अशोक बडगुजर, मनोज रामचंद्र बडगुजर, शरद त्र्यंबक बडगुजर, प्रदीप लक्ष्मण बडगुजर, दीपक प्रकाश बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.
ज्येष्ठ महिलांचा सन्मान
समाजाने महिलांना सातत्याने सन्मान दिला आहे. यापूर्वी उन्नती मंडळाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन लहान मुलींच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ महिलांना हा सन्मान देण्यात आला. तसेच कन्यारत्न प्राप्त माता-पित्यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. समाजातील पहिले नगरसेवक असलेल्या दिलीप बडगुजर यांचाही ज्येष्ठ नागरीकांनी यावेळी सत्कार केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*