पिंपळकोठेकर प्रतिष्ठित शेतकरी श्री. बाबुराव (बबन) दगडूशेठ बडगुजर यांची लहान सूनबाई, श्री. किशोर बाबुराव शेठ बडगुजर यांची सुविद्य पत्नी सौ नंदादीप किशोर बडगुजर यांची पिंपळकोठा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपळकोठा बुद्रुक हे गाव एरंडोल जवळ, जळगाव रोड नॅशनल हायवे 6 वर आहे. या गावाला मागचे पिंपळकोठा म्हणून सुध्दा ओळखले जाते. सौ. नंदादीप ताई या अगोदर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या आणि ठरल्याप्रमाणे श्री. ज्ञानेश्वर बडगुजर यांनी राजीनामा दिला व सौ. नंदादीप बडगुजर यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. सौ. नंदादीप ताई आणि त्यांचे पती श्री. किशोर बडगुजर यांना सामाजिक कौल चांगला असल्यामुळे त्या पहिल्यांदा ग्रा. पं. सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचे माहेर बोदवडचे आहे. त्या बोदवड येथील श्री. भगवान नारायण बडगुजर यांची लहान मुलगी आहे. त्यांचे वडील एसटी ड्राॕयव्हर होते ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्यांचे पती म्हणजे किशोर बडगुजर हे BA Bed (English) आहेत आणि आता ते भुसारमालाचे उत्कृष्ट व्यापारी आहेत. त्यांचे गावात चांगले प्रस्थ आणि प्रभुत्व आहे. दोघं पतीपत्नींची सामाजिक बांधिलकी आणि समाजसंपर्क चांगला असून या दाम्पत्यास समाजकार्य करण्याची आवड आहे.श्री. किशोर भाऊ यांना आत्मविश्वास आहे की ते पुन्हां एकदा सरपंच म्हणून निवडून येतील.त्यांना समाजकार्यातही रुची आहे आणि गावातल्या समस्या पुर्णतः सोडवण्यात ते सदैव प्रयत्नशील असतात.तसेंच गावासाठी काहीतरी करावेसे त्यांना वाटते म्हणून त्यांनी हा वसा घेतलेला आहे. त्याची इच्छा लवकरच पुर्ण होवो.
त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण समाजातून आनंद व्यक्त होत आहे तसेच शुभेच्छा, व अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल “बडगुजर समाज मंडळ” औरंगाबादचे अध्यक्ष – श्री. कैलास बडगुजर, सौ ज्योती बडगुजर व इतर समाज बांधवांनी त्यांचे पुष्पगुच्छ व पेढे देवून सत्कार केला.
सौ. नंदादीप ताई यांच्या या निवडीबद्दल, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड गृप,वेब पोर्टल टीम तसेच संपूर्ण बडगुजर समाजाकडून अभिनंदन व शुभेच्छा……..! ????????

सौ. नंदाताई यांच्या या निवडीबद्दल, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड गृप तसेच संपूर्ण बडगुजर समाजाकडून अभिनंदन व शुभेच्छा……. ?????


Leave a Reply