Customer_Feedback – यशस्वी व्यवसायाची गुरूकिल्ली – श्री. अविनाश बडगुजर, पनवेल

आपण दहावीची बोर्ड परिक्षा दयायला जाण्याअगोदर सर लोकं सांगायचे कि , पेपर लिहून झाला कि परत एंकदा वाचून काढावा !

आठवतयं ?

म्हणून मग बिझनेसचा एक अत्यंत महत्वपूर्ण चॅप्टर आपण skip करून जातो. जो आहे कस्टमर फीडबॅक !

पण ते जमायचंच नाही !
किंवा असं म्हणा ! कि ते आवडायचं नाही , कारण ??? तर कारण असं कि बऱ्याच जणांना परत परत त्याच गोष्टी उगाळायला आवडत नाहीत .

” तुम्हाला आमचा प्रॉडक्ट किंवा सर्विस कशी वाटली ? ”

हा एकच प्रश्न आपल्याला अनेक गोष्टी सांगून किंवा शिकवून जातो, त्यामुळे तो घेणे अतिशय आवश्यक आहे.

प्रत्येक यशस्वी व्यवसाय , उद्योग असा फिडबैक घेत असतो.
त्याच्या काही पद्धती आपण बघूया !

A) Common [ सामान्य पद्धती]
B) Advanced [ प्रगत पदधती ]


A) Common [ सामान्य पद्धती] :

Help tickets : यात सरळ सरळ विचारलं जातं एक फॉर्म दिला जातो, ग्राहकाने तो भरून माहिती दिली कि त्या बदल्यात त्यास तात्काळ डिस्काऊंट किंवा कॅशबैक दिला जातो. लोकं याला सुद्धा भरभरून प्रतिसाद देतात .Google Pay ने याचाच वापर करून जम बसवला .

2) Surveys : सरकार किंवा कंपन्या आपल्या बद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम सर्वे करवून घेतात , त्यातून खूप मोठा डेटा मिळतो . न्यूज चॅनल्स तर याचा फार मोठा फायदा करतात … ” जनता कि आवाज ” म्हणू म्हणू ” ओरडत सांगतात .

3 ) Reviews : पूर्वी संग्रहालयात किंवा अन्य कुठल्याही ठीकाणी एक रजिस्टर ठेवलंलं असायचं , त्यात आपलं मत लिहिता येत असायचं, आज काल लोकं Google ,facebook , insta वर Review करतात.

4) In Person: या प्रकारात समोरासमोर विचारलं जातं कि , ” कसं वाटलं साहेब ” ? फोन कॉलवर विचारला जातो अनुभव.
लोकं सांगतात , मोकळेपणाने सांगतात , आपल्याला काय पाहिजे ते उचला !

5) Blog post : कंपनीचे मॅनेजर , मालक अथवा अन्य कोणी कर्मचारी एखादा ब्लॉग किंवा फेसबुक पोस्ट करून विचारू शकतात … कि कसा वाटला अनुभव ? महिंद्राचे आनंद महिंद्रा याच्यामुळेच सोशल साईट्स वर जास्त अॅक्टीव असतात.

B) Advanced [ प्रगत पदधती ] :
जी गोष्ट सरळ सरळ विचारली जाऊ शकत नाही किंवा कळत नाही ती थोडया वेगळ्या पद्धतीने विचारली जाऊ शकते. याच्या पण काही पद्धती आहेत .
या प्रकाराला Goldmining the deta असं म्हणतात कारण यातून सोन्यासारखी महत्वाची माहिती मिळत रहाते .

(1 ) Feature Request : कच्चा पक्का प्रोडक्ट तयार करून मार्केटला उभा करणे आणि ग्राहकालाच विचारणे कि अजून यात काय फिचर तुम्हाला आवश्यक वाटतात ? असं विचारणे ही गोष्ट म्हणजे feature Request होय . जसं Nokia ला ग्राहक सतत म्हणत राहिला कि डबल सीम पाहिजे ! पण त्यांनी लक्ष दिलं नाही .

(2 ) Cancelation survey:
ग्राहक रजिस्टर करतो काही पेमेंट पण करतो आणि नंतर ऑर्डर कॅन्सल करतो . आता या स्थितीत आपल्याला कळलं पाहिजे कि त्याने कॅन्सल का केलं ?
हे जर कळलं तर पुढे आपल्याकडून ती चुक होणार नाही .

(3 ) Social Platforms :
लोकं सोशल साईट्स वर जास्त व्यक्त होतात , करा स्वतःचं फेसबुक पेज , एक कम्युनिटी तयार करा , विचारा त्यांना तिथे ,,, ” अजून काय नवीन दयायला पाहिजे ” ?
लोकं त्यांचा वेळ देऊन कमेंटस करतील ते पण आपल्या फायदयासाठी ,,, करून घ्या ना त्याचा फायदा .

( 4 ) Customer Boards : जनता सरकारचे एखादे धोरण आवडले नाही तर सहयांचे अभियान राबवते , एका मोठ्या बोर्डवर मत मांडते .
तसा बोर्ड आपण पण लावू शकतो का ?जरा विचित्र वाटेल पण हे काम करते .

हे सगळे प्रकार आपल्याला ग्राहकाचं आपल्या बद्दलचं मत सांगतात . ते ऐकून घेऊन त्यावर काम करून , आवश्यक ते बदल करून आपण आपल्या व्यवसायाची वाढ आधिक वेगाने करू शकतो , यात वादच नाही .

“ज्याचे कान मोठे नाहीत तो व्यापारी उद्योजक मातीत जातो ” , अशा आशयाची जपानी म्हण आहे , आणि हा फार्म्यूला जपानी कंपन्या तंतोतंत पाळतात , त्यामुळेच कदाचित ज्यांनी त्यांच्यावर अॅटमबॉम्ब टाकला त्या अमेरिकेत सर्वात जास्त जपानी कार्स विकतात .

म्हणूनच व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपण आपल्या ग्राहकांची प्रतिक्रिया (Feedback) घ्यायला हवे. यातून आपण अजून व्यवस्थित रित्या आपला व्यवसाय चालविण्यास मदत होते. आज औद्योगिक क्षेत्रात कुठलीही कंपनी असो ते या पध्दतीचा वापर आवर्जून करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*