
गणराज्य दिनानिमित्त सनशाईन स्टार किड्स च्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी दिंडीतून दिला समाजप्रबोधपर संदेश
पालखी सोहळा व गणराज्य दिन सनशाईन स्टार किड्समध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांनी आणि पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी पालखी तयार केली. पलखीला फुलांनी सजावट करण्यात आली होती आणि त्यात संत निवृत्तीनाथ यांचा फोटो होता. पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी वारकरी म्हणून पारंपारिक ड्रेसेस घातले आणि जत्रा हॉटेल परिसर व कोणार्क नगर परिसरात दिंडी मिरवणुकीत पालखी नेली. मिरवणुकीत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत निवृत्तीनाथ यांचे भजन आणि गायली गेली.

विद्यार्थ्यां व पालक
शाळेत येती मुले । मैदान शाळेचे खुले।, वृक्ष होऊ देऊ नका रुक्षII, Be Drastic ! Say No Plastic ! !, जो खरा विद्यार्थी तो झाडांचा सारथी॥, जो तोडी झाडे । तो खाई जोडे॥, विद्यार्थी पालक – शिक्षक । ठरतील भारताचे रक्षका , जो घेई । शिक्षण । तो देई संरक्षणा , शिक्षणात जो पुढे । सत्यासाठी तो लढे॥, शिक्षणाची महती न्यारी । गुरूशिष्याला प्यारी॥, शिक्षणासाठी सवड । उच्च जिवनशैलीची निवडा , शिक्षणाने । उंचावेल माझी माना आयुष्याच्या होईल सन्मान॥, शिक्षणाने उंचावेल मान । आयुष्याभर मिळेल सन्मान॥, जो घेई उच्च शिक्षणा , तो नाकारेल आरक्षणा असे अधुनिक समाजप्रबोधनपर फलक दाखवून दिंडी गणराज्य दिन साजरा करण्यात आला.
सदर उपक्रमास प्राध्यापक सी. डी. साळुंखे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर आधुनिक म्हणी प्राध्यापक सी. डी. साळुंखे सर यांच्या लिखाणातून व प्रोत्साहनातून सादर करण्यात आल्या.

पालखी सोहळ्यात शाळेच्या संचालिका सौ. स्वाती बडगुजर तसेच शिक्षक वृंद ज्योती चौधरी, राजश्री खोटेले, कशिष भालेराव, पालक ज्योती माळी, नीता घुगे, जयश्री पवार, सुप्रिया तेजाळे, अंजली तेजाळे,भाग्यश्री भंगरे,आशा पाटील, सोनाली पाटील ,पिंकी राठोड, स्मिता देशमुख, सुजाता मढवई उपस्थित होते.
शाळेच्या संचालिका सौ .स्वाती बडगुजर यांनी पालकांचे आभार व्यक्त केले.


Leave a Reply