बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद चे श्री शक्तीधाम मंदिर, शरणापुर फाटा, औरंगाबाद येथे सहलीस उत्सुर्त प्रतिसाद – श्री. हर्षल बडगुजर, औरंगाबाद

दिनांक- 26/1/2020 रोजी बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद च्या वतीने सामाजिक सहलीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळेस श्री शक्तीधाम मंदिर, शरणापुर फाटा, औरंगाबाद येथे सहलीचा कार्यक्रम नियोजन करण्यात आले. या सहलीस औरंगाबादकर समाज बांधवांनी उपस्थित राहून सहलीचा आनंद उपभोगला. औरंगाबाद समाज मंडळ नेहमीच असे उपक्रम राबविते. अशा उपक्रमामधून समाज संघटन अधिकाधिक मजबूत करण्यास मदत होते.

सहलीनिमित्ताने बरेचसे समाज बांधवांशी ओळख होते व नातेसंबंध घनिष्ठ होतात. तसेच आपल्या परिवारास सुध्दा वेळ देता येतो. या सहलीच्या कार्यक्रमात विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. महिलांचा हळदी कुकंवाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व समाज बांधव व भगिनींनी स्नेहभोजनाचा स्वाद घेतला. कार्यक्रमात समाज बांधवांनी आपले कलागुण दाखविले कोणी गायन केले तर कोणी आपले मनोगत व्यक्त केले तर कोणी खेळ खेळत आपले कौशल्य दाखविवे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे औरंगाबाद समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. कैलास बडगुजर यांनी सुमधुर आवाजात गायलेले गाणे सर्वांना मंत्रमुग्ध करणारे होते.

औरंगाबाद बडगुजर समाज महिला मंडळ

सहलीचे आयोजनासाठी श्री.हर्षल सुरेशशेठ बडगुजर, श्री.निलेश भिकाशेठ बडगुजर, श्री.चंद्रकांत दगडुशेठ बडगुजर, श्री. अशोक मधुकरशेठ बडगुजर, श्री.जितेंद्र भास्करशेठ बडगुजर, सौ. भावनाताई सुनिलशेठ बडगुजर, सौ.प्रियंकाताई हर्षलशेठ बडगुजर, सौ.हर्षनाताई रमेशशेठ बडगुजर, सौ.किर्तीताई निलेशशेठ बडगुजर व श्री.सुनिल रमेशशेठ बडगुजर यांनी परीश्रम घेतले.

औरंगाबाद बडगुजर समाज मंडळ सहलीस उपस्थित समाज बांधव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*