दिनांक 8 डिसेंबर रोजी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या कार्यकारिणी सदस्यांच्या सभेचे आयोजन कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कुऱ्हे गावचे सरपंच श्री. रामलाल गोविंदा बडगुजर यांनी केले होते. माननीय अध्यक्ष श्री. माधवराव अण्णा बडगुजर, माजी अध्यक्ष श्री. उमेश आप्पा करोडपती, माजी अध्यक्ष व सलोखा समिती प्रमुख श्री. आनंदा धोंडू सूर्यवंशी, महासचिव श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर आणि इतर कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
सभेची सुरुवात दीप प्रज्वलन व चामुंडा मातेचे पूजन करून झाली. श्री. माधवराव अण्णा बडगुजर यांचा गावचे सरपंच श्री. रामलाल बडगुजर यांनी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. तसेच श्री. रामलाल बडगुजर यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल महासमितीच्या वतीने, धुळे बोर्डिंग, जळगाव विद्या प्रसारक मंडळ, नवोदय युवा मंच यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आलेल्या सर्व मान्यवर कार्यकारणी सदस्यांचे कुऱ्हे येथील युवकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर सभेची सुरुवात महासमितीचे सचिव श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील विषय सभेपुढे मंजुरीसाठी ठेऊन केली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून सर्व सभेची मंजुरी एकमताने घेऊन पुढील विषयावर चर्चा सुरू करण्यात आले.
- आजपर्यंतच्या जमाखर्चाचा सभेकडून मंजुरी
- नूतन अध्यक्षांना आर्थिक व्यवहार करणे बाबत मंजुरी
सदरील विषयावर सर्व सभासदांनी हे एकमताने मंजुरी दिली. चर्चा सुरू असताना आर्थिक व्यवहार करणे बाबत खजिनदार अध्यक्षांसह सचिवांना सुद्धा याविषयी अधिकार मिळावे अशी मागणी …….. यांनी केली. त्यास …….. यांनी अनुमोदन करीत तीन पैकी दोन सह्या किंवा परवानगी ग्राह्य धरण्यात यावी. असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
- माननीय धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नवीन अध्यक्ष निवड झाल्याबद्दल फेरफार प्रस्ताव दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली.
- वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन संदर्भात कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावर पुस्तक प्रकाशन समिती प्रमुख श्री. सुधीर बडगुजर यांनी कार्याचा आढावा देत परिचय पत्र फॉर्म चा नमुना आणि विभागनिहाय माहिती पत्रकाचा नमुना सभेसमोर सादर केला व बदल असल्यास सुचवावे, असे आवाहन केले. यावर अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले आणि सूचनाही केल्या. यात जळगाव विद्या प्रसारक मंडळ, अध्यक्ष श्री. लिलाधर बडगुजर यांनी आपले मंडळ आयोजक म्हणून इच्छित आहे आणि जिल्ह्यातून या उपक्रमात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवून देण्यास प्रयत्न करू, असे सांगितले व काही नांवे माहिती पुस्तकात टाकणे बाबत सुचविले. अर्थ समिती प्रमुख श्री. सुरेश महाले यांनी ही यावर आपले मत मांडले व काही सूचना दिल्या. ओबीसी समिती उपप्रमुख श्री. एस्. एम्. बडगुजर यांनी मुंबई विभागातील सर्व यथायोग्य माहिती आणि नियोजन करणे संदर्भात मदतीचे आश्वासन दिले. यानंतर सामूहिक विवाह सोहळा करण्यास इच्छुक असा उल्लेख करावा, अशी सूचना माजी अध्यक्ष श्री. उमेश आप्पा करोडपती यांनी केली. ही सूचना करताच सभेतील सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून समर्थन केले. तसेच सलोखा समिती अध्यक्ष श्री. आनंदा सूर्यवंशी यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजन करण्यात सर्व सदस्यांनी आणि समाज बांधवांनी मदत करून पुढाकार घ्यावा आणि याची सुरुवात स्वतःच्या घरातून नातेवाईकांपासून करावी. याची सुरुवात स्वतःपासून करणेचे आश्वासन दिले.
श्री. सुधीर बडगुजर पुढे बोलतांना त्यांनी परिचय पुस्तिका जाहिरात दरासंदर्भात माहिती दिली. त्यात सदस्यांनी काही बदल सुचवले ते करण्यास मंजुरी घेऊन नवीन बदल केलेले नमुना पत्रे समितीस दाखवून निर्णय घ्यावा व लवकरात लवकर नियोजन करून जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करावे, अशी सूचना माननीय अध्यक्ष माधवराव अण्णा यांनी केली.

- यानंतर महासचिव राजेंद्र सरांनी अध्यक्ष परिषद घेण्यासंदर्भात चर्चेला सुरुवात केली. या सरांनी आतापर्यंत केलेले नियोजन सविस्तर रीत्या व नियोजनबद्ध पणे सभेसमोर मांडले. अगदी आज पावतो गावागावातील समाज मंडळांचा संपर्क आणि त्यांची माहिती, तसेच अध्यक्ष परिषदेचे आयोजन कशासाठी करावे, याविषयी मार्गदर्शन करतांना त्यांनी यातून समाज संघटन मजबूत होईल, अनिष्ट रूढी परंपरा, मानपान घेणे, सर्व समाज मंडळांच्या अध्यक्ष व सचिव द्वारे सर्व समाज बांधवांना महासमिती सोबत जोडणे आणि समाजात एकतेचा प्रवाह या अध्यक्ष परिषदेमार्फत करण्याचे प्रयोजन आहे, असे सांगितले.
याविषयी चर्चा करीत असताना माजी अध्यक्ष श्री. उमेश आप्पा करोडपती यांनी त्यांना सरस्वती मिशन बहुउद्देशीय संस्थेने दिलेला अर्ज सभेसमोर वाचून दाखविला. त्यात अध्यक्ष परिषद ही संकल्पना मिशन सरस्वतीची आहे, असे नमूद केले होते. सदर अर्ज वाचत असतांनाच ओबीसी समिती उपप्रमुख श्री. एस्. एम्. बडगुजर सरांनी यावर आक्षेप घेत श्री. उमेश आप्पांना त्यांनी अध्यक्ष परिषदेविषयी तीन वर्षांपूर्वी झालेल्या महासमितीच्या सभेत झाल्याची आठवण करून दिली आणि सदरची संकल्पनाही महासमितीचीच आहे, असे निदर्शनास आणून दिले. याचे समर्थन सर्व सभासदांनी एकमताने केले. यावर महासमितीचे अध्यक्ष श्री. माधवराव अण्णा बोलत असतांना, त्यांनी मिशन सरस्वतीला सक्त ताकीद दिली, की श्रेय वादाकडे जाऊ नये, कार्यास प्राधान्य द्यावे. महासमिती ही अध्यक्ष परिषदेचे आयोजन करेल व यास सर्व समाज मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्षांनी बोलतांना केले. यानंतर श्री. सुधीर बडगुजर यांनी सुद्धा मत व्यक्त केले. यावर सभासदांनी अध्यक्ष परिषदेत सर्व समाज मंडळांचे अध्यक्ष आणि सचिव येतील तर त्यात मिशन ही असेलच मग यासाठी वेगळा अर्ज देऊन मिशन सरस्वती समाजाची दिशाभूल करत आहे, असे उपस्थित सदस्यांनी मत व्यक्त केले. समाजकार्य करताना श्रेयवाद टाळावा, असे मान्यवरांनी सांगितले. मिशन सरस्वतीचे ई-न्यूज विभाग हाताळणारे श्री. एच्. आर. बडगुजर सर यांनी यावर सभेत झालेल्या चर्चेचे समर्थन करत मिशनचा अर्ज दुर्लक्षित करण्यात यावा, असे आवाहन करत सभेतील इतर विषयावर चर्चा करण्यात यावी असे सांगितले.

सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अध्यक्ष परिषद आयोजन व नियोजन करणे एकमताने संमती देऊन पुढील विषयावर चर्चा सुरू केली. ऐन वेळेच्या विषयात कुऱ्हे गावातील नवीन स्थापन झालेल्या महिला समाज मंडळाचा सत्कार करण्यात आला तसेच एम. पी.एस्. सी. परीक्षेतून उत्तीर्ण होऊन सहाय्यक नगर रचना अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याबद्दल चि. दिपक पंडित बडगुजर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सचिवांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली, असे सांगून सभेचा समारोप करण्यात आला. यानंतर सर्व मान्यवरांनी व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
सदर सभा कुऱ्हे पानाचे येथे आयोजित केल्या मुळे गावात अगदी हर्ष उल्हासाचे वातावरण होते आणि बरेच समाज बांधव कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

Nice. Good news
Congratulation of all badhakar bandhu.Very good work done by kurhe panache Badgujar bandhav.My best wishesh for further progress by our sarpanch shri Ramlalseth Badgujar.
Congratulations . Good work done by kurhe panache badgujar brothers.specialy by Sarpanch Shri Ramlal Badgujar.My best wishesh for bright future of badgujar samaj.
धन्यवाद सर ?