एंजल इंग्लिश स्कुल मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

नंदुरबार : दि .23/1/2020 गुरुवार रोजी ‘एंजल इंग्लिश स्कुल’ मध्ये तसेच ह्या शाळेची दुसरी शाखा कल्याणी रेसीडेंसी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदुरबार बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री.विजय बडगुजर ह्यांनी भुषविले. शाळेतल्या चिमुकल्यानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा केली होती. त्यामुळे नेताजींचा इतिहास तसेच त्यांचे कार्य या चिमुकल्यानी डोळ्यासमोर आणले.
दुर्वेश पाटील, तनिष्का चौधरी, कुणाल कोकणी, जान्हवी वाघ, हेतवी पाटील, यूग पटेल, स्मित पाटील, सारा पटेल, दृष्टी, ईशी या छोट्या एंजल्सनीआपल्या भाषणातून त्यांच्या स्मृतीला पुन्हा उजाळा दिला‌‌.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सौ.प्रिती बडगुजर व सौ. हर्षदा शुक्ल यांचे मार्गदर्शन लाभले.
सुत्र संचालन सौ. जयश्री सोनार यांनी केले व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*