शिंदखेडा-तालुक्यातील सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता मंदिरावर दि.२६ जानेवारी (रविवार) रोजी मातेचा भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रोत्सवाचा सोनशेलू पंचक्रोशिसह धुळे जिल्ह्यातील बडगुजर समाज बांधव तसेच मॉं चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मॉं चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलूतर्फे करण्यात आले आहे.
सोनशेलू (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील मॉं चामुंडा माता मंदिरावर दरवर्षी बडगुजर समाजाची कुलदैवत आई चामुंडा मातेचा यात्रोत्सव भरत असतो. येथील चामुंडा मातेचे जागृत देवस्थान असून येथे राज्यासह परराज्यातून समाज बांधवांबरोबरच पंचक्रोषितील नागरीक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. सालाबादाप्रमाणे यंदाही मॉं चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलू (ता.शिंदखेडा) यांच्यावतीने नवसाला पावणारी कुलस्वामिनी आई चामुंडा मातेचा यात्रोत्सव कार्यक्रम दि.२६/०१/२०२०, रविवार रोजी येथील चामुंडा माता मंदिरावर होणार आहे.

यावेळी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत होमहवन, १० ते १०.३० वाजेपर्यंत महाआरती, तसेच सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा सोनशेलू पंचक्रोशिसह धुळे जिल्ह्यातील बडगुजर समाज बांधव तसेच मॉं चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मॉं चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलूतर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply