नाशिक येथील कु. जान्हवी सतीश बडगुजर हिला प्रधानमंत्री स्कॉलरशिप फंड स्कीम मधून स्कॉलरशिप मंजूर – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव

नाशिक येथील सीआयएसएफ कर्मचारी श्री. सतीश पितांबर बडगुजर यांची मुलगी कुमारी जान्हवी हिला प्रधानमंत्री स्कॉलरशिप फंड स्कीम मधून स्कॉलरशिप मंजूर करण्यात आलेली आहे. जानवी ही नाशिक येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून तिची कॉलेजमध्ये गणना होते. म्हणूनच तिला ही स्कॉलरशिप देऊन भारत सरकार कडून गौरवण्यात आले. जान्हवी ही बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, जळगाव चे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर यांची भाची आहे. अशाप्रकारची स्कॉलरशिप मिळून समाजाचा नावलौकिक जान्हवी ने वाढवलेला आहे. तिचे सर्व समाजाकडून तथा बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव यांच्याकडून खूप खूप अभिनंदन. भविष्यातही तिच्याकडून समाजाचं नाव उंचावण्यास मदत होवो ही शुभेच्छा.

शुभेच्छूक :
बडगुजर विद्याप्रसारक मंडळ, जळगांव,
अ. भा. ब. स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप.

कु. जान्हवी सतीश बडगुजर

1 Comment

  1. !!! ? खुप खुप अभिनंदन ? !!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*