श्री. विजय चव्हाण ( कल्याण ) यांची कॅपजेमिनी कंपनी इंग्लंड येथे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी निवड होऊन लंडन येथे रवाना

कल्याण- पूर्व येथील रहिवासी श्री विजय गुलाब चव्हाण ( अमळनेर ) हे इंजिनिअर असून जगप्रसिद्ध कंपनी कॅपजेमिनी इंडिया लिमिटेड मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीने इंग्लंड येथे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी श्री विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली व त्यांना दिं.12 जानेवारी 2020 रोजी लंडन येथे रवाना झाले. या कंपनी मधील आधुनिक उच्च तंत्रज्ञान विकसित मध्ये “ऍडव्हान्स ऑटोनॉमस ड्राईव्ह सिस्टम” या प्रकल्पासाठी ते लंडन येथे रवाना झाले, त्यांना मुंबई एअरपोर्टवर त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या प्रस्थानास प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री विजय चव्हाण हे जगभरातील नामांकित कॉर्पोरेट क्षेत्रातील एक नामांकित आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्या मध्ये टॅलेंट व यशस्वी इंजिनिअर म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच ते आता पर्यंत 12 देशात अनेक प्रकारचे आधुनिक उच्च तंत्र विकसित करण्यास सहभाग आहे.


श्री विजय चव्हाण हे आपल्या बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई व सरस्वती मिशन यांच्या सोबत समाजातील प्रत्येक समाज कार्यात सहपत्नी सहभाग होऊन सहकार्य करत असतात. अश्या आपल्या समाजातील कुशल इंजिनिअर श्री विजय चव्हाण यांना खूप खूप शुभेच्छा.

3 Comments

  1. बडगुजरांचें नाव सातासमुद्रापालिकडे ( लंडन) नेणारे विजय चव्हाण सारांचे खूप अभिनंदन

  2. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा !! ?

  3. अभिनंदन विजय चव्हाण सर, माझा मुलगा प्रणव बडगुजर (B TECH NIT, रायपूर) याचे सुद्धाCAIPGEMINI कंपनीत SENIOR DATA ANALYST म्हणून कॅम्पस प्लेसमेंट झाले आहे

Leave a Reply to सुनील मधुकर बडगुजर, उल्हासनगर Cancel reply

Your email address will not be published.


*