देशाचा भूमिपुत्र, विविध संकटांवर मात करणारा, वेळप्रसंगी रखरखत्या उन्हात राबणारा, देशाच्या आर्थिक कण्याचा ‘आधार’ अर्थात आपला बळीराजा. आपल्या अन्नदात्याच्या मेहनतीला सलाम करण्याचा आजचा दिवस.
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस (23 डिसेंबर) दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी यांनी भरीव कामगिरी केली.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांची स्थापना त्यांनी केली. त्यामुळेच अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. आज शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शासकीय योजना जाणून घेऊयात…
- कृषि यांत्रिकीकरण उपअभियान : केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर औजारांचा पुरवठा करणे व कृषि औजारे बँक स्थापण करणे आदी घटक राबविण्यात येतात. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला व इतर सर्वसाधारण शेतकरी आदी प्रवर्गातील लाभधारकांना लाभ दिला जातो.
? या ठिकाणी संपर्क साधावा : कृषि संचालक (नि. व गुनि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-01
- नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10 टक्के भांडवली अनुदान : विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या राज्यातील कापूस उत्पादक विभागात कापसावर आधारित वस्त्रोद्योगाला मोठया प्रमाणात चालना देणे यासाठी हि योजना आहे.
जास्तीत-जास्त कापसाची प्रक्रीया राज्यात व्हावी याकरीता राज्यातील मागास भागात जास्त गुंतवणूक आकर्षित करणेसाठी या भागातील वस्त्रोद्योग घटकांना बॅंकेमार्फत घेण्यात आलेल्या टफ अंतर्गत पात्र दिर्घ मुदती कर्जाच्या 10 टक्के भांडवली अनुदान दिले जाते.
? अधिक माहितीसाठी संपर्क साधा : कार्यासन टेक्स-5, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, नवीन प्रशासन इमारत, 14 वा माळा, मंत्रालय, मुंबई- 400032 ? Email- texpolicy@gmail.com
- राअसुअ अंतर्गत ऊस विकास कार्यक्रम : उसाच्या खर्चात कपात करुन उत्पादकता वाढविणे, दर्जेदार बियाण्याच्या वापरास प्रोत्साहन देणे व बेणे निर्मितीसाठी वसंतदादा साखर संस्थेमार्फत बीजोत्पादन व बेणे वितरण करणे यासाठी हो योजना आहे.
? अधिक माहितीसाठी संपर्क साधा : संबधित मंडळ कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी.
? (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Leave a Reply