भार्गव रघुवंशी याची तायक्वांदो स्पर्धेमध्ये रेड बेल्ट टू पर्यंत मजल
ईश्वरलाल निंबा रघुवंशी यांचे चिरंजीव व निंबा शंकर रघुवंशी यांचा नातू चि.भार्गव रघुवंशी याने अलिबाग या ठिकाणी दिनांक 31 /10 /2019 ते 3 /11 / 2019 या काळात झालेल्या तायक्वांदो स्पर्धेमध्ये रेड बेल्ट 2पर्यंत मजल मारली. या स्पर्धेत त्याला बेस्ट स्टूडेंट म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चि.भार्गव रघुवंशी हा डी.ए .वी. पब्लिक स्कूल पनवेल येथील इयत्ता सातवी चा विद्यार्थी असून एक अष्टपैलू कलाकार म्हणून सुद्धा त्याची शाळेत ओळख आहे. लहानपणापासूनच तायक्वांदोची विशेष आवड असल्यामुळे भागवणे कराटे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. चि. भार्गवला आतापर्यंत वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ब्रॉझ, सिल्वर, तसेच गोल्ड मेडल प्राप्त झालेले आहे. या सोबतच त्याला ट्रॅक सूट सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. तायक्वांदो या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने वाईट, येलो, ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यु, ब्ल्यु वन, याव्यतिरिक्त रेड , रेड वन आणि रेड टू इतक्या प्रकारचे बेल्ट मिळालेले आहेत. त्याच्या कामगिरीवरून भविष्यात नक्कीच तो राष्ट्रीय स्तरावर ती
भारताचे ,देशाचे, पर्यायाने समाजाचे नाव पुढे नेईल यात तिळमात्र शंका वाटत नाही.
तायक्वांदो व्यतिरिक्त भार्गवला वेगवेगळ्या विषयांमधील असलेल्या आवडीमुळे अनेक बक्षिसे सन्मानपत्र मिळालेले आहेत. गणित, ट्रेकिंग ,पॉट मेकिंग ,संगीत याबरोबरच विविध प्रकारच्या घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सुद्धा त्याने यश मिळवलेले आहे. यासाठी त्याला नेहमी वडील ईश्वर आणि आई सारिका ईश्वरलाल रघुवंशी यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. असे म्हणतात ,””की खेळामध्ये पुढे गेलेला विद्यार्थी अभ्यासात मागे राहतो”” मात्र भार्गव याने हे म्हणणे खोटे करून दाखवले आहे. खेळा सोबतच गणित विषयाच्या विविध परीक्षा त्याने दिलेल्या आहेत. रायगड गणित अध्यापक मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य गणित संबोध परीक्षेमध्ये सुद्धा भार्गव ने गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
यासोबतच भार्गव ला संगीताची सुद्धा आवड असून अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या गायन कलेमध्ये सुद्धा त्याने प्रथम वर्षाची गायन विशारद परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली आहे. नुकतीच त्याने गायन विशारद मधील द्वितीय परीक्षा सुद्धा दिलेली असून त्यात सुद्धा तो प्रावीण्य मिळवणारच. सध्या तो गायन विशारद मधील तृतीय परीक्षेचा सराव करत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत दरवर्षी निवासी साहस शिबिरे आयोजित केले जात असतात. मुलांमध्ये साहसी वृत्ती विज्ञानवादी दृष्टिकोन उपक्रमशीलता श्रमप्रतिष्ठा व सहकार्य या भावना विकसित करण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे राज्यभर राबवली जात असतात .या शिबिरांमध्ये सुद्धा भार्गव ने केवळ सहभाग न घेता आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली आहे. अनिस मार्फत घेतल्या गेलेल्या या साहसी शिबिरांमध्ये त्याने पॉट मेकिंग, ट्रॅकिंग व विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

वरील गुण-कौशल्यांचे व्यतिरिक्त शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुद्धा भार्गव हा नेहमी सहभागी होत असतो. विज्ञान विषयाची आवड असल्यामुळे तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनांमध्ये सुद्धा तो सहभागी होत असतो बहुआयामी गुण कौशल्यांचा विकास होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सहशालेय इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आवश्यक असते हे त्याच्या आतापर्यंतच्या यशातून कळून येते. विविध नाटकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका बजावण्याचे काम सुद्धा भार्गव करत असतो .त्याच्या आतापर्यंतची यशस्वी कामगिरी बघता त्याच्या वयातील प्रत्येक मुलाने आपले बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी अनेक प्रकारचे छंद जोपासले पाहिजे याची आजच्या आधुनिक युगात गरज भासते. विद्यार्थ्यांचा चौफेर विकास होण्यासाठी त्याच्यातील विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी केवळ “पुस्तकी किडा “न बनून राहतात विद्यार्थ्यांचा चौफेर विकास झाला पाहिजे यासाठी त्याने ज्या विविध कला जोपासल्या आहेत अशाच प्रकारच्या कला समाजातील इतर मुलांनी सुद्धा आत्मसात कराव्यात हीच विनंती. आजच्या आधुनिक युगातील आइस्टाइन म्हणून भार्गवला म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे मला वाटते . समाजातील इतर मुलांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो….
तसेच भार्गव चे आजोबा (आईचे वडील) श्री. रामकृष्ण बडगुजर आणि परिवार, पनवेल यांचेकडून भार्गव चे खास कौतुक आणि अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा… आणि आर्शिवाद.
शब्दांकन : प्राध्यापक श्नी. मिलिंद चिंधु बडगुजर (9421184495)


Leave a Reply