असा घेतात अपमानाचा बदला! – रतन नवल टाटा कडून शिकावे – लोकेश कोतवाल, पुणे

रतन नवल टाटा

देशातलं एक महत्त्वाचं आणि मोठं नाव म्हणजे उद्योगपती रतन नवल टाटा. आज त्यांचा जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील एक प्रसिद्ध आणि गाजलेला किस्सा जाणून घेऊयात…

हा किस्सा आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कारण महान व्यक्ती आपल्या अपमानाचा बदला कसा घेतात? याचं उत्तर देणारा हा किस्सा आहे.

1988 साली टाटा समूहाने भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांनी आपली पहिली हचबॅक कार ‘इंडिका’ला सादर केले. मात्र लोकांनी तिला पुर्णपणे नाकारल्यामुळे कंपनीला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.

अखेर टाटा यांनी आपल्या कार डिव्हिजनला विकण्याचा निर्णय घेत जगभरातील सर्व कंपन्यांना याबाबतचे प्रस्ताव पाठवले. पुढे अमेरिकन ‘फोर्ड’ कंपनीने खरेदीमध्ये रस दाखवत टाटा यांना फोर्डचे मुख्यालयात डेट्रॉयटला बोलावले. यावेळी त्यांची मॅरेथॉन मिटिंग झाली. मात्र यावेळी टाटा यांना मिळालेली वागणूक अत्यंत अपमानास्पद होती.

बिल फोर्ड यांनी टाटा यांना सल्ला देताना कार विषयी अनेक प्रश्न उपस्थित करत आम्ही कारची खरेदी करून तुमच्यावर उपकारच करणार असल्याचे सांगितले. नाराज होऊन टाटा यांनी हा करार न करण्याचे ठरवले.

भारतात परत येताना प्रवासादरम्यान टाटा खूप उदास आणि भावुक झाले होते. पण म्हणतात ना कटू प्रसंगानंतर सुखद प्रसंग तुमची वाट पाहत सतात. फक्त थोडा धीर धरावा लागतो. अखेर टाटा यांच्या मेहनतीला लोकांनी स्वीकारत कारमध्ये रुची दाखवण्यास सुरुवात केली. यामुळे टाटा हळू-हळू जगातील टॉप ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये सामील होण्याकडे वाटचाल करू लागली.

काळ लोटला तशी परिस्थितीही बदलली. 2008 साली टाटा समूह यशाच्या शिखरावर तर फोर्ड कंपनी प्रचंड तोट्यात होती. मग टाटा यांनी फोर्डला बहुचर्चित आणि प्रसिद्ध ब्रँड जगुआर आणि लँडरोवर विकत घेण्याबाबत प्रस्ताव दिला. बिल फोर्ड हा प्रस्ताव स्वीकारत टाटाचे मुख्यालय गाठले.

यावेळी त्यांच्यात 2.3 अरब डॉलरमध्ये (त्यावेळचे 9300 कोटी) सौदा निश्चित झाला. दरम्यान फोर्ड यांनी टाटांचे कौतुक करत सांगीतले की, ‘जगुआर आणि लँडरोवर खरेदी करून तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात.’

अशा प्रकारे टाटा यांनी अपमानाचा बदला कसा घ्यायचा? याचे एक वेगळेच उदाहरण जगासमोर ठेवले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*