सुरत येथील रहिवासी श्री. सुधाकर नारायण बडगुजर हे यांचा सेवानिवृत्तीचा व चि. हेत आणि हेत्वी यांचा प्रथम वाढदिवस सोहळा संपन्न – श्री. प्रकाश बडगुजर, सुरत

सुरत येथील रहिवासी श्री. सुधाकर नारायण बडगुजर हे नुकतेच भारतीय पोस्टल डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त दिनांक 25 डिसेंबर बुधवार रोजी SMC हॉल, पालनपुर, सुरत येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मित्रमंडळी, नातेवाईक तसेच त्यांच्या पोस्टल डिपार्टमेंटचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुरत येथील क्षत्रिय बडगुजर समाज, सूरतचे माजी अध्यक्ष श्री. गोपाल भाईदास बडगुजर हे होते. तसेच त्यांच्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक, समाजसेवक श्री. यशवंत गंगाराम बडगुजर, श्री. मुरलीधर नारायण बडगुजर, श्री. बाळकृष्ण कोतवाल त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विलासराव दंगल बडगुजर हे उपस्थित होते.

श्री. सुधाकर शेठ यांना अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांपैकी श्री. बाळकृष्ण कोतवाल, श्री. हिरालाल बडगुजर, संपादक, सुरत परिक्रमा, सौ. अश्विनी बडगुजर, सौ. रोहीनी बडगुजर आणि बोदवड येथील श्री. संजय जनार्दन बडगुजर यांनी शब्दसुमनांनी शुभेच्छापुर्ण मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि प्रास्ताविक हे बडगुजर प्राऊड ग्रुपचे लोकेश कोतवाल यांनी केले.

तसेच सर्व उपस्थितांतर्फे पुढील निवृत्त जिवनासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पुढील जीवन आरोग्यमय, स्वास्थ संपन्न राहो, ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासोबतच त्यांच्या जुळ्या मुलांचा प्रथम वाढदिवसाचा कार्यक्रम पण आयोजित करण्यात आला होता. सर्वांनी चि. हेत आणि हेत्वीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. बाळगोपाळ आणि नातेवाईकांच्या समक्ष हा आनंददायी सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

चि. हेत, कु. हेत्वी, सौ. कल्पना आणि श्री. सुधाकर बडगुजर, सहपरिवार फोटो

सुरत येथील श्री. सुधाकर नारायण बडगुजर यांची भारतीय पोस्टल डिपार्टमेंट मधून यशस्वीपणे सेवानिवृत्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक – श्री. प्रकाश पाडुरंग पाटील, सुरत,
अध्यक्ष – श्री. गुरूदत्त एज्युकेशन ट्रस्ट, सुरत,
प्रिन्सींपल – द ग्लोबल इंडियन स्कूल, डिंडोली, सुरत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*