बडगुजर समाजात आनंदी आनंद! – श्री. दिलीप भाऊ बडगुजर यांची नंदुरबार नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड – श्री. विजय बडगुजर, नंदुरबार


नंदुरबार – समाजाची निष्ठेने व प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे फळ लाभत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांनाही श्री. दिलीपभाऊ बडगुजर यांना नंदुरबार नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून सन्मानीत केले गेले आहे. या बडगुजर जननायकाच्या रूपाने समाजालाही बहुमान दिला गेला आहे!

आपल्या बडगुजर समाजासाठी तळमळीने झटण्याची वृत्ती पाहून माननीय माजी आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी साहेब यांनी त्यांची नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली आहे.

श्री दिलीप भाऊंचा नगरसेवक म्हणून सन्मान म्हणजे नंदुरबार बडगुजर समाजासाठीच नव्हे तर अखिल भारतीय बडगुजर समाजासाठी अभिमानाची बाब आहे.

श्री दिलीप भाऊ हे अनेक वर्षांपासून अहोरात्र समाजसेवा करीत आहेत. समाजसेवा हे त्यांचे व्रतच आहे.

सन 2000 मध्ये नंदुरबार येथील बडगुजर समाजातील काही तरुण मंडळी एकत्र आली. त्यांनी नंदुरबार मंडळाची स्थापना करायचे ठरवले.
तेव्हापासून श्री. दिलीप भाऊ यांनी नंदुरबार बडगुजर समाज उन्नती
मंडळाचे नाव हे संपूर्ण बडगुजर समाजात प्रसिद्ध केले. तेव्हापासून श्री. दिलीप भाऊ यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

त्यांच्या समाजसेवेचाआलेख नेहमी चढताच राहिला आहे. श्री दिलीप भाऊ यांचा सन 2002 ते 2017 कार्यकाळ अध्यक्षपदावर राहिला. तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीच्या प्रमुखपदीही
ते विराजमान आहेत.

श्री दिलीप भाऊ यांच्या या यशाबद्दल नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार येथील सर्व समाज बांधव, अखिल भारतीय
बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप यांच्यातर्फे
हार्दिक हार्दिक अभिनंदन!

देवी चामुंडा माता आपल्या कार्याला यश देवो. व आपला समाजकार्याचा आलेख नेहमी चढताच राहो!
पुढील वााटचाली हार्दिक शुभेच्छा.

2 Comments

  1. श्री दिलीपभाऊ,
    आपली न पा नंदुरबार येथे बिनविरोध स्विकृत नगरसेवक पदी निवड होवुन नंदुरबार येथे आपला समाज अल्प असुन आपण कर्तत्वावर समाजाचा झेडा रोवला, यास्तव आपले हार्दिक अभिनंदंन

Leave a Reply to Yashwant K Chavan Cancel reply

Your email address will not be published.


*