(प्रतिनिधी) दिनांक २३ डिसेंबर २०१९ रोजी कुंड्यापाणी-बिडगांव ता.चोपडा जि.जळगांव येथील कै.ओंकार गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात “बाल आनंद मेळावा” थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर मेळाव्याचे उदघाटन बिडगांव ग्राम पंचायत सरपंच सौ.खातुनबाई कादर तडवी यांनी केले. कार्ययक्रमाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब विठ्ठल ओंकार पाटील होते. सदर बाल आनंद मेळावा अतिशय उत्साही वातावरणात झाला.मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ३० स्टाॕल लावले होते, सदर प्रसंगी सौ.रत्नाताई विठ्ठल पाटील यांनी स्टाॕलधारक विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिलीत.

तसेंच दि.२४डिसेंबर२०१९ रोजी सदर माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणेत आला,अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बापूसाहेब श्री.विठ्ठल ओंकार पाटील तर उदघाटक म्हणून संस्था सचिव अण्णासाहेब विजय हिरालाल करोडपती यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमास बिडगांव सरपंच सौ.खातुनबाई कादर तडवी,उप सरपंच सौ. शकुंतलाबाई प्रदिप पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, गांवकरी,विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री.एस्.एम्. पठार यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक,शिक्षकतेर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने यशस्वीरित्या केले.
———————–
श्री.किशोर एकनाथ बडगुजर, उप शिक्षक, कै.ओं.गो.पाटील माध्यमिक विद्यालय,कुंड्यापाणी-बिडगांव


Leave a Reply