दि. 25 डिसेंम्बर 2019 रोजी आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त “अटल भूजल योजनेचा ” पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि जलशक्ति मंत्री माननीय गजेंद्रसिंग शेखावत यांच्या शुभहस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे शुभारंभ करण्यात आला, महाराष्ट्रासह सात राज्यात ही योजना राबविण्यात येणार असून या योजनेत जळगाव जिल्हयाचा समावेश करण्यात आला असल्याने जळगाव जिल्ह्यातील भूजल क्षेत्रात काम करीत असलेली अनुभावी स्वयंसेवी संस्था म्हणून मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव या संस्थेस जलशक्ती मंत्रालयाकडून आमंत्रण देण्यात आले होते, त्यानुसार संस्था अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी ही श्री. संजय जगन्नाथ बडगुजर यांना मिळाली.

ते जळगांव जिल्हाचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम त्यांच्या जीवनातील एक आविसम्मरणीय दिवस आणि एका वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगाचा दिवस ठरला. आणि या ऐतिहासिक दिवसाचे ते साक्षीदार झालेत. ते म्हणजे भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेबांचे प्रबोधन आणि त्यांच्या हस्ते झालेल्या अटल भूजल योजनांचे उदघाटन, हे होय. या कार्यक्रमास आमंत्रित सदस्य म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण व मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या समोर 6 व्या लाईन मध्ये बसण्यासाठी विशेष सोय हा योग त्यांना आला.

श्री. संजय बडगुजर हे जळगांव येथील रहिवासी असून एक तत्पर समाजसेवक पण आहेत. आपल्या समाज बांधवाच्या कामाची केंद्र सरकार कडून दखल घेण्यात आली आणि अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमात आमंत्रण दिले. ही आपल्या समाजासाठी भुषणावह बाब आहे. आणि केंद्र सरकार तर्फे देण्यात आलेल्या योजनेवर आपण अतिशय प्रभावीपणे कार्य कराल आणि आपले आणि आपल्या समाजाचे नांव राष्ट्रीय पातळीवर नक्कीच न्याल ही खात्री आम्हा सर्वांना आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक : अ. भा. ब. स. महासमिती,
अ. भा. ब. स. ओबीसी समिती,
अ. भा. ब. स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप
आणि समस्त वेबपोर्टल टिम


Very nice Article ?????
Congratulations of all badgujar family,
Congratulations संजय जी, आपल्या वाट चालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा
Congratulations Sanjay bhau
Standing First in NIRD Hyderabad exam.
Your expertise has been proved & will be useful again in Rural area development .
We are Proud of you,Best Wishes. Dattatray L Badgujar thane.