बडगुजर समाज युवा मित्र मंडळ, पिंंप्री ता. धरणगांव तर्फे श्री चामुंडा माता पालखीचे दि. ५ जानेवारी रोजी आयोजन – हरीष बडगुजर, पिंप्री

नमस्कार ??
पिंप्री ता. धरणगांव येथे बडगुजर समाज युवा मित्र मंडळ तर्फे आपली कुलदैवत श्री चांमुडा माता ची पालखी सोहळा मिरवणूकी आणि महाप्रसादाचे आयोजन दिंनाक ०५/०१/२०२० रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता करण्यात आलेले आहे. गावातील राममंदीरा पासुन पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या पालखी सोहळ्याव्दारे समाज संघटन मजबूत करणे आणि युवाशक्तीला एकत्रित करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. तसेच आपल्या कुलदैवत श्री चामुंडा मातेचे पुजन करणे या भक्तीमय हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्व बडगुजर समाज बांधव व महिलांनी व ग्रामस्थांनी, मित्र परिवार यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बडगुजर समाज युवा मित्र मंडळ, पिंप्री तर्फे करण्यात आले आहे.

श्री. चामुंडा माता पालखी सोहळ्यास समस्त वेब पोर्टल टिम, बडगुजर प्राऊड ग्रुप, युवक समिती आणि समस्त बडगुजर समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा.

जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अ. भा. ब. स. महासमिती आणि सर्व उप समिती तर्फे कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.

कार्यक्रम स्थळी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*