अमळनेर, ता. २३ : सुरत- मालदा या रेल्वे गाडीच्या स्वच्छता गृहात
महिला प्रसूत झाल्याची घटना आज अमळनेर रेल्वेस्थानकावर घडली. रेल्वेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण बडगुजर यांनी उपचार केले. माता अन बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून दोघांची प्रकृती सुखरूप असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
गाडी क्रमांक 13426 सुरत-मालदा एक्सप्रेसने कुटुंबियांसह ती
महिला सुरत येथून मालदा येथे जात होती. सात महिन्यांची ती गरोदर
होती. मात्र अमळनेर स्थानकाजवळ अचानक वेदना सुरू झाल्या. स्वच्छता गृहात नेल्यावर महिलेने बालिकेला जन्म दिला. रेल्वे प्रशासनास माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण बडगुजर, तसेच डीएसआर रजनेश कुमार, अजय डी यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डॉ. बडगुजर यांनी महिलेस धीर देत पुढील उपचार केले. यानंतर महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
बालिकेचे वजन अवघे एक किलो असल्याने धुळे येथे हलविण्याचा
सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


Leave a Reply