यावल,शिरसाड ह.मु.कल्याण येथील उद्योजक, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ माजी अध्यक्ष, अ.भा.बडगुजर स.महासमिती संचालक श्री. सतीश दिगंबर बडगुजर यांचा मुलगा चि. कुमार सतीश बडगुजर ‘अमेझॉनडॉट कॉम’ या मल्टिनॅशनल कंपनीत Product Manager म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या कंपनीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना पदोन्नती देऊन थेट अमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यालय अमेरिका येथे त्यांना ‘सिनियर प्रोडक्ट मॅनेजर’ म्हणून पदोन्नती मिळाली. येत्या 23 तारखेला त्यापदावर रुजू होण्यासाठी बुधवार दिं.19.12.2019 रोजी मुंबई एअरपोर्ट येथून ते रवाना झाले.
चि. कुमार यांनी BE, MBA चे शिक्षण भारतातील नामवंत कॉलेज ISB Hyderabad मधून घेतले आहे.
अमेझॉन ही जगातील एक मोठी नामांकित कंपनी असून त्यात आपला एक वेगळाच ठसा हा कुमारने उमटविला आहे. कंपनी मध्ये कुमार हा एक युवा कर्मचारी सिनियर प्रोडक्ट मॅनेजरची बढती घेऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले व यशाची खरी गुरूकिल्ली म्हणजेच आपले कार्यकुशलता हे सिध्द करून दाखविले.


त्यांचे वडील श्री. सतीश दिगंबर बडगुजर, आई सौ. प्रतिभा बडगुजर बहीण डॉ. मयुराताई व आजी यांनी शुभाशीर्वाद देऊन प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.
चि. कुमार यांना अ. भा. ब. स. महासमिती, ओबीसी समिती, युवक समिती आणि प्राऊड ग्रुप तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…


खुप छान प्रगती कुमार…?? मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ?
व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा ! ?
तुझ्या यशा बरोबर तुझ्या आई व वडिलांचे ( प्रतिभा आक्का व सतिश शेठ) यांचे अभिनंदन
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ?
व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ! ?