अमळनेरच्या कु. सायली किरण बडगुजर ने राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत ठरली कास्यंपदकची मानकरी – श्री. सिध्देश्वर बडगुजर, कुर्हे पानाचे

आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ३४ वी पुरूष गट आणि ३० वी स्त्री गटाची राष्ट्रीय आट्यापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाने केले होते. या स्पर्धेत देशभरातील सर्वच राज्याच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यास्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. सायली किरण बडगुजर हिला भेटली. या राष्ट्रीय खेळाडूने या संधीचे सोने करत महाराष्ट्राला या स्पर्धेत कांस्यपदक पटकवून दिले.

विजेतेपद मिळालेले राज्य खालील प्रमाणे :

” राष्ट्रीय आट्यापाट्या विजेतास्पर्धा 2019-20 “
प्रथम – केरळ राज्य.
द्वितीय- पाॅन्डेचरी के.शा.प्र.
तृतीय- महाराष्ट्र राज्य.
कु.सायली किरण बडगुजर.
( राष्ट्रीय खेळाडू )
प्रताप काॅलेज,अमळनेर.
“कास्यंपदक” ची मानकरी.

तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आणि राष्ट्रीय स्पर्धेत तिने आपली वेगळीच ओळख राष्ट्रीय पातळीवर रोवली. बडगुजर समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे. कु.. सायलीचे हि मांडळ ह. मु अमळनेर येथील श्री. किरण शांताराम बडगुजर यांची कन्या आहे. किरण बडगुजर हे मांडळ येथे शिक्षक आहेत आणि कु. सायलीच्या यशात त्यांचे अनमोल मार्गदर्शन तिला उपयुक्त ठरले. कु. सायली हिचे आईवडील, नातेवाईक, शिक्षक वृंद, सहकारी आणि मैत्रिणींतर्फे कौतुक केले जात आहे.

तिला मिळालेल्या यशाबद्दल कु. सायलीचे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
?????

शुभेच्छूक : बडगुजर वेब पोर्टल टिम

1 Comment

  1. कु.सायलीचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! ? ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*