नवीन सहकारी यंत्रमाग संस्थाना सुधारित आकृतीबंदानुसार रा.स.वि.नि. पुरस्कृत अर्थसहाय्य

⚡ अनुसूचित जाती/जमाती व अल्पसंख्याक समाजाच्या नवीन सहकारी यंत्रमाग संस्थाना सुधारित आकृतीबंधानुसार रा.स.वि.नि. पुरस्कृत अर्थसहाय्य देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.? योजनेच्या प्रमुख अटी: अ) अनुसूचित जाती : 1) अनुसूचित जातीचे सहकारी तत्वावरील यंत्रमाग घटक.2) संस्थेतील किमान 80% सभासद अनुसूचित जातीचे असावेत.3) संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुसूचित जातीचे असावेत.4) इतर अटी शासन निर्णय 24 फेब्रुवारी1999 मधील तरतुदीनुसार.ब) अनुसूचित जमाती1) अनुसूचित जमातीचे सहकारी तत्वावरील यंत्रमाग घटक.2) संस्थेतील किमान 80% सभासद अनुसूचित जमातीचे असावेत.3) संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुसूचित जमातीचे असावेत.4) इतर अटी शासन निर्णय 24 फेब्रुवारी 1999 मधील तरतुदीनुसार.क) अल्पसंख्याक समाज1) अल्पसंख्याक समाजाचे सहकारी तत्वावरील यंत्रमाग घटक.2) संस्थेतील किमान 80% सभासद अल्पसंख्याक समाजाचे असावेत.3) संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अल्पसंख्याक समाजाचे असावेत.4) इतर अटी शासन निर्णय 24 फेब्रुवारी 1999 मधील तरतुदीनुसार.? आवश्यक कागदपत्रे : शासन निर्णय 24 फेब्रुवारी 1999 व शासन निर्णय क्रमांक धोरण-2012/प्र.क्र.30/टेक्स-2, दि.16 मार्च, 2012 मधील तरतुदीनुसार.? लाभाचे स्वरूप असे : शासकीय भागभांडवल व रा.स.वि.नि.कर्ज देण्यात येते. सुधारित आकृतिबंध 5:45:50 यामध्ये 5 % स्वभागभांडवल, 45 % शासकीय भागभांडवल, 50% कर्ज देण्यात येते. ? या ठिकाणी संपर्क साधावा : ▪ संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.▪ प्रादेशिक उपसंचालक, मुंबई.▪ प्रादेशिक उपसंचालक, सोलापूर.▪ प्रादेशिक उपसंचालक, औरंगाबाद.▪ प्रादेशिक उपसंचालक, नागपूर.? (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*